Jump to content

"नवान्न पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आश्विन महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या पहिल्या दिवसाच्या पौर्णि...
खूणपताका: वार्तांकनशैली ?
(काही फरक नाही)

१३:४०, ३० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

आश्विन महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या पहिल्या दिवसाच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात, तर दुसर्‍या दिवशी येणारीला आश्विन पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा किंवा नव्याची पौर्णिमा म्हणतात.

निसर्गाबद्दल वाटणार्‍या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंबी, कुरडूची फुलें, नाचणी, वरी आणि झेंडूची फुलें खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात.

घरासमोर लावलेल्या हरतर्‍हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकर्‍यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.

मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. नवे(अनेकवचन नवी) म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी. संगमेश्वरसह विविध बाजारात या दिवशी नव्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते.