चर्चा:नवान्न पौर्णिमा
येथील माहिती कोजागरी पौर्णिमा येथे एका विभागात हलवून या लेखाकडून कोजागरी पौर्णमा लेखाकडे पुनर्निर्देशन करावे असा प्रस्ताव मी ठेवतो आहे.
अभय नातू (चर्चा) २१:५३, ३० ऑक्टोबर २०१२ (IST)
नवान्न पौर्णिमेचा उल्लेख कोजागरी पौर्णिमा या लेखात आलाच आहे, त्यामुळे नवान्न पौर्णिमा हा लेख त्या लेखात विलीन करण्याचे खास कारण दिसत नाही. शिवाय या दोन पौर्णिमा दोन वेगळ्यावेगळ्या दिवशी येत असल्याने, आणि त्या त्या दिवशी करायचे विधी आणि उत्सव वेगळे वेगळे असल्याने दोन्ही लेख एकत्र करू नयेत असे मला वाटते. प्रत्येक लेखात दुसर्या लेखाचा दुवा दिला असल्याने दोन्ही लेख स्वतंत्र ठेवावेत. ज्याप्रमाणे भागवत एकादशी आणि स्मार्त एकादशी या लागोपाठच्या दोन दिवशी येऊ शकतात, तसाच हा प्रकार आहे. याउप्पर काही स्वतंत्र मुद्दे असल्यास उचित विचार करता येईल.....J (चर्चा) १६:०४, ३ नोव्हेंबर २०१२ (IST)
या लेखातील मजकूर कोजागरी लेखात हलवीत आहे. कमी आशयाचा मजकूर असलेला लेख ठेवण्यापेक्षा मोठ्या लेखाचा उपमथळा म्हणून येथील माहिती वापरणे इष्ट वाटते. आर्या जोशी (चर्चा) ०९:२४, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)