"ओकारान्त नावांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: जगामध्ये ओ-कारान्त व्यक्तिमामे क्वचित असतात. पाश्चात्य नावां-आड... खूणपताका: विशेषणे टाळा |
(काही फरक नाही)
|
००:५७, २७ जुलै २०१२ ची आवृत्ती
जगामध्ये ओ-कारान्त व्यक्तिमामे क्वचित असतात. पाश्चात्य नावां-आडनावांमध्ये आर्नाल्डो, ऑगस्टिनो, अँतोनियो सारखी नावे मुळात आर्नोल्ड, ऑगस्तिनी किंवा ॲन्टनी सारख्या नावांची बदलेलेली रूपे असतात. पौर्वात्य नावांमध्ये सुकार्नो(मूळ सुकर्ण), सुहार्तो(मूळ सुहृद्) ही अशीच नावे. जपानमध् मात्र टोजो, अकाहितो, हिरोहिटो अशी बरीच आडनावे आहेत. त्यामानाने ओकारान्त मराठी आडनावे फारच थोडी आहेत. उदा० तोरो, टोंगो, कानगो आणि कानुंगो(ओरिसा) वगैरे.
असे असले तरी एके काळी मराठीत बरीच व्यक्तिनावे ओकारान्त होती. मात्र ही बहुतेक नावे लिखाणमात्र होती. या नावांच्या व्यक्तींना हाक मारताना किंवा त्यांचा आदरार्थी उल्लेख करताना त्या नावांना पंत किंवा जी जोडणेच प्रशस्त समजले जाई. हल्लीच्या काळात अशा नावाची माणसे आढळून येत नाहीत.
अशी काही नावे कान्हो, केरो, खंडो, गुंडो, गोरो, घारो, चोखो, चिंतो, दत्तो, दासो, धोंडो, नारो, निळो, बंडो, बाळको, मोरो, रंगो राघो, विनो, सालो मालो, सोनो इत्यादी.
अशा काही नावांच्या प्रसिद्ध मराठी व्यक्ती : -
- कान्हो त्रिमलदास (१५व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक एक प्राचीन कवी.
- कान्हो पाठक (इ.स.१८९०) एक ज्ञानेश्वरकालीन कवी
- कान्होपात्रा (इ.स.१४६८) : एक संत कवयित्री
- कान्होबा (१७वे शतक) : तुकारामाचा धाकटा भाऊ. तुक्याबंधू या नावाने याने अभंग रचले आहेत.
- कान्होबा : श्रीकृष्णाचे एक नाव.
- केरो : प्राचार्य केरो लक्ष्मण छत्रे (१८२४-१८८४) हे ज्योतिषविषयक आणि सृष्टिविषक ग्रंथांचे लेखक होते.
- खंडो बल्लाळ : हा मराठ्यांचा स्वामिभक्त चिटणीस होता.
- खंडो कृष्ण गर्द (१८४८-१९२४) हे कानडी व मराठी भाषेतील एक विद्वान लेखक आणि कवी होते.
- गुंडो दासो कंपली : हे सांगली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शिक्षक आणि मुख्या्ध्यापक होते. आयुष्यातील उत्तरार्धात ते पुण्यातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभा या संस्थेचे प्रमुख कार्यवाह होते.
- गोरोबा (गोरा कुंभार) (१२६७-१३१७) :
- चिंतो कृष्ण वळे (१८व्या शतकाचा उत्तरार्ध) : भाऊसाहेबांची बखर या सुप्रसिद्ध बखरीचा एक सहलेखक.
- चिंतो विश्वनाथ : १८६७साली प्रसिद्ध झालेल्या सर्वेपरिज्ञान नामक ११२२ पानी ग्रंथाचे विद्वान लेखक. हा ग्रंथ मुंबईच्या ज्ञानप्रकाश छापखान्याने छापून प्रकाशित केला होता.
- चोखोबा ऊर्फ चोखा्मेळा (मृत्यू १३३८). एक संतकवी.
- दत्तो वामन पोतदार :
- दासो दिगंबर देशपांडे (१५५१-१६१६) : दासोपंताची पासोडी नामक ग्रंथाचे लेखक.
- दासो दिगंबर (सतरावे शतक) : एक मराठी कवी आणि संताची चरित्रे लिहिणारे लेखक.
- धोंडो केशव कर्वे :
- नारायण मालो : जुन्या काळचा एक एक पदे रचणारा कवी.
- नारो त्रिंबक (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक मराठीशाहीर
- नारो भिकाजी रत्नपारखी ऊर्फ मौनीस्वामी :
- नारो सखाराम (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक बखरकार.
- नारोबा : संत नामदेवांच्या चार मुलांतील एक. याने रचलेले काही अभंग नामदेव गाथेत आहेत.
- नारो भिकाजी रत्नपारखी
- निळोबा : एक संतकवी.पूर्ण नाव निळोबा मुकुंद पिंपळनेरकर. मृत्यू : इ.स.१७५३. हे तुकारामाचे शिष्य होते.
- बाळकोबा भावे : विनोबा भाव्यांचे बंधू
- मोरोपंत तथा मोरेश्वर रामाजी पराडकर (१७२९-१७९४)
- रंगो बापूजी (मृत्यूू १८८५): सातार्र्याच्या छत्रपतींचे कारभारी आणि वकील. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात यांचा सक्रिय सहभाग होता. यांच्याय स्मृतिप्रीत्यर्थ ठाणे शहरातील एका चौकाला रंगो बापूजी गुप्ते चौक असे नाव दिले आहे. प्रबोधन ठाकऱ्यांनी यांचे चरित्र लिहिले आहे.
- सालो मालो : तुकारामाचे प्रतिस्पर्धी प्रवचनकार
- सोनोपंत दाडेकर (१८९६-१९६८) :
- विनोबा भावे :
[वर्ग:मराठी नावे]