विशु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विशुनिमित्त मिरवणुकीसाठी सजवलेले हत्ती

विशु' हा केरळ राज्यातील नववर्ष स्वागताचा दिवस आहे.मेड्डम नावाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हा नववर्ष आरंभाचा सण साजरा केला जातो. ग्रेगोरिअन कालगणनेनुसार सामान्यतःएप्रिल महिन्याच्या मध्यात चौदा किंवा पंधरा तारखेला हा सण साजरा केला जातो.भौगोलिकदृष्ट्या वसंत ृृृृऋतूशी संबंधित हा विषुववृत्तीय सण आहे.

कानि कनल[संपादन]

विशुच्या दिवशीचा हा एक महत्वाचा विधी आहे. या दिवशी प्रत्येक हिंदू कुटुंबात एका मोठ्या भांड्यात सर्व पवित्र गोष्टी एकत्र ठेवल्या जातात. या भांड्याला "उरुली" असे म्हणतात. पहाटे उठल्यावर सर्वात प्रथम या पवित्र वस्तूंचे "दर्शन" कुटुंबातील सर्व सदस्यांना घडवले जाते.यासाठीतांदूळ,लिंबू,काकडी,नारळ,फणस,सुपारी,पैसेपिवळी फुले,दिवा,विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली जाते.[१]या दिवशी वडिलधार्‍या व्यक्ती लहान मुलांना पैसे भेट देतात आणि गरीबांनाही पैशाचे दान दिले जाते.[२] या दिवशी गोड,आंबट,तुरट असे वेगवेगळ्या चवींचे पदार्थ असलेले भोजन केले जाते.नवीन कपडे घालून लहान मुले फटाके उडवून आपला आनंद व्यक्त करतात.

विशु कनी

विष्णुपूजन[संपादन]

या दिवशी विष्णूचे किंवा विष्णूच्या कृष्णरूपाचे पूजन केले जाते.लोक घरातील मूर्तीचे पूजन करतात किंवा स्थानिक विष्णू किंवा कृष्ण मंदिरात दर्शनासाठी जातात. अयप्पा मंदिर किंवा गुरुवारुय मंदिर येथे या दिवशी दर्शनासाठी विशेष गर्दी होते.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Jagannathan, Maithily (2005). South Indian Hindu Festivals and Traditions (en मजकूर). Abhinav Publications. आय.एस.बी.एन. 9788170174158. 
  2. ^ Menon, A. Sreedhara (2010-07-12). Legacy of Kerala (en मजकूर). D C Books. आय.एस.बी.एन. 9788126437986. 
  3. ^ Dalal, Roshen (2010). Hinduism: An Alphabetical Guide (en मजकूर). Penguin Books India. आय.एस.बी.एन. 9780143414216.