विलोमकाव्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विलोमकाव्य ही काव्याची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. ही बहुदा, संस्कृत भाषेत आढळते. यातील शब्दरचना अशी असते कि,यातील श्लोकाची पहिली ओळ ही शेवटच्या अक्षराकडून प्रथम अक्षराकडे (विलोम पद्धतीने, म्हणजेच उलटी) वाचली असता दुसरा श्लोक तयार होतो. तो पहिल्या श्लोकाइतकाच अर्थपूर्ण असतो. ही फार रंजक व वैशिष्ट्यपूर्ण अशी काव्यरचना आहे.

उदाहरण[संपादन]

श्रीरामकृष्णविलोमकाव्यम्[संपादन]

तं भूसुतामुक्तिमुदारहासंवंदे यतो भव्यभव दयाश्रीः | (पहिली ओळ)
श्री यादवंभव्यभतोयदेवं, संहारदामुक्तिमुतासुभूतम् || (दुसरी ओळ)

अर्थ[संपादन]

  • (पहिली ओळ): सीतेची सुटका करणाऱ्या गंभीर हास्य असणाऱ्या, भव्य असा अवतार असणाऱ्या व ज्यांचेपासून सर्वत्र दया व शोभा प्राप्त होतात, अशाला (त्या रामचंद्राला) मी वंदन करतो.
  • (दुसरी ओळ):भव्यप्रभा असणारा सूर्य व जलमय चंद्र यांचाही जो देव त्याला, संहार करणाऱ्या (पूतनेलाही) मुक्ति देणाऱ्याला आणि सृष्टीला प्राणभूत असणाऱ्या त्या यदुनंदनाला(कृष्णाला) मी वंदन करतो.

या विलोमकाव्यात सुमारे ३६ श्लोक आहेत.विषम श्लोक हे रामाचे वर्णन करतात, तर सम श्लोक हे कृष्णाचे. विषम श्लोक हे विलोमरितीने (उलटे) वाचले असता नंतरचे सम श्लोक तयार होतात. (जसे श्लोक१ उलटा वाचला असता, श्लोक२ आणि श्लोक३ उलटा वाचला असता, श्लोक४ याप्रकारे...)याची रचना दैवज्ञपंडित 'सूर्यकवी' यांनी केलेली आहे.[ दुजोरा हवा] अशी रचना जगातील कोणत्याही भाषेत असणे शक्य वाटत नाही.[ संदर्भ हवा ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.