विद्याधर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदू संस्कृतीप्रमाणे, अप्सरा, किन्नर, गंधर्व, यक्ष यांजप्रमाणे, विद्याधर हे अर्धदेव समजले जातात. त्यांच्या पत्‍नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर :

राजपुत्र अलंकारशील, कल्याणक, कालसंवर (हा विजयार्ध पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या मृतवती देशातील कालकूट नगरीचा स्वामी होता), जीमूतकेतु (जीमूतवाहनाचा पिता), जीमूतवाहन, नरवाहनदत्त, मदनवेग (या विद्याधराने एका लावण्यवतीला, ती झोपेत असताना उचलून नेले होते... बृहत्कथा), सुदर्शन, सुमनस्‌, हेमकुंडल, हेमप्रभ, वगैरे.

एकेकाळी ज्यांचे महाराष्ट्रात राज्य होते, ते शिलाहार वंशातील राजे, स्वतःला जीमूतवाहनाचे वंशज मानीत.

विद्याधरी[संपादन]

  • अलंकार प्रभा : हेमप्रभ या विद्याधराची पत्‍नी. हिला वज्रप्रभ नावाचा पुत्र आणि रत्‍नप्रभा नावाची कन्या होती.
  • कांचनप्रभा : अलंकारशील या विद्याधराची पत्‍नी. हिला अलंकारवती नावाची कन्या होती. तिचे लग्न नरवाहनदत्त या विद्याधराशी झाले. ... काञ्चनप्रभा कथासरित् ९.१.१६
  • कांचनमाला : कालसंवर नामक विद्याधराची पत्‍नी
  • गुणमंजरी : ही कल्याणक नावाच्या विद्याधराची पत्‍नी आहे.
  • सुरतमंजरी : हिचे लग्न उज्जयिनीचा राजपुत्र अवंतिवर्धनशी झाले होते.