Jump to content

विद्याधर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू संस्कृतीप्रमाणे, अप्सरा, किन्नर, गंधर्व, यक्ष यांजप्रमाणे, विद्याधर हे अर्धदेव समजले जातात. त्यांच्या पत्‍नीला विद्याधरी म्हणले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर :

राजपुत्र अलंकारशील, कल्याणक, कालसंवर (हा विजयार्ध पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या मृतवती देशातील कालकूट नगरीचा स्वामी होता), जीमूतकेतु (जीमूतवाहनाचा पिता), जीमूतवाहन (राजपुत्र), नरवाहनदत्त (याला अनेक पत्नी होत्या), मदनवेग (या विद्याधराने एका लावण्यवतीला, ती झोपेत असताना उचलून नेले होते... बृहत्कथा), सुदर्शन, सुमनस्‌, हेमकुंडल, हेमप्रभ, वगैरे.

एकेकाळी ज्यांचे महाराष्ट्रात राज्य होते, ते शिलाहार वंशातील राजे, स्वतःला जीमूतवाहनाचे वंशज मानीत. राजा हर्षवर्धनाने नागानंद नावाचे एक उत्कृष्ट पाच-अंकी संस्कृत नाटक लिहिले आहे. राजपुत्र जीमूतवाहन हा नाटकाचा नायक आहे. गरुडाचे भक्ष्य म्हणून जाणाऱ्या नागांचे प्राण वाचावेत म्हणून जीमूतवाहन आपणहून नागरूपात गरुडाकडे जातो व बळी जातो. (नाटकाची मूळ कथा सोमदेव भट्टाच्या कथासरित्सागरातली आहे.)

नरवाहनदत्ताच्या पत्नी : अजिनावती, अलंकारवती, कर्पूरिका, गंधर्वदत्ता, भागीरथयशा, मदनकंचुका (सर्वात लाडकी पत्नी), मंदरदेवी, रत्नप्रभा,


विद्याधरी

[संपादन]
  • अलंकार प्रभा : हेमप्रभ या विद्याधराची पत्‍नी. हिला वज्रप्रभ नावाचा पुत्र आणि रत्‍नप्रभा नावाची कन्या होती.
  • कांचनप्रभा : अलंकारशील या विद्याधराची पत्‍नी. हिला अलंकारवती नावाची कन्या होती. तिचे लग्न वत्सराजपुत्र नरवाहनदत्त या विद्याधराशी झाले. धर्मशील हा अलंकारवतीचा मोठा भाऊ. ... काञ्चनप्रभा कथासरित् ९.१.१६
  • कांचनमाला : कालसंवर नामक विद्याधराची पत्‍नी
  • गुणमंजरी : ही कल्याणक नावाच्या विद्याधराची पत्‍नी आहे.
  • मलयवती : ही जीमूतवाहनाची पत्नी.
  • सुरतमंजरी : हिचे लग्न उज्जयिनीचा राजपुत्र अवंतिवर्धनशी झाले होते.