विडा
Jump to navigation
Jump to search

विड्याचे घटकपदार्थ: गुंडाळलेली नागवेलीची पाने, डाव्या बाजूला वरच्या भागात पक्क्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला वरच्या भागात कच्च्या सुमारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला मध्यभागी तंबाखू व उजव्या बाजूकडील खालच्या कोपऱ्यायात लवंगा.
विडा, अर्थात पान, (अन्य नाव: तांबूल ;) हा भारतीय उपखंड व आग्नेय आशियात मुखशुद्ध्यर्थ चघळला/खाल्ला जाणारा पदार्थ आहे. काथ, चुना, सुपारी हे आवश्यक घटक नागवेलीच्या पानावर ठेवून पानाची पुरचुंडी केली की विडा बनतो. याशिवाय आवडीनुसार अणि उपलब्धतेनुसार विड्यात कंकोळ, कापूर, खसखस, खोबरे, जायपत्री, तंबाखू, बडीशेप, बदाम, लवंग, वेलदोडा, इत्यादी घटक पदार्थ असू शकतात. स्थानपरत्वे विड्याचे अनेकविध प्रकार आढळतात.
विड्याचे आकाराप्रमाणे आणि घडीनुसार गोविंद विडा, पानपट्टी, पुडीचा विडा, पुणेरी विडा, मद्रासी विडा आदी प्रकार आहेत. विड्यासाठी वापरायच्या पानाचेही तिखट कलकत्ता पान, पूना पान, बनारसी, छोटे जोडीने घेतले जाणारे मघई पान आदी प्रकार आहेत.
हेही पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |