पानवेल
Jump to navigation
Jump to search
पनवेल याच्याशी गल्लत करू नका.
पानवेल तथा नागवेल वनस्पती आहे. याच्या पानांपासून विडे करतात.ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.ही एक लागवडयोग्य वेल आहे. याचे पान विडा करण्यासाठी वापरतात. भोजनोत्तर विडा खाल्याने भोजनाचे निट पचन होते.विडा करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात त्रयोदशगुणी विडा प्रसिद्ध आहे.
मूळ स्थान[संपादन]
याचे मूळ स्थान जावा बेटे आहे. त्यानंतर ती जगभरात गेली.
लागवड[संपादन]
यासाठी भुसभुसीतजमीन व सुपीक जमीन हवी. भारताच्या दक्षिण भागात मलबार प्रदेशात, आणि बंगाल, गुजरात,महाराष्ट्रामधे नागवेलीची शेती होते.
पिकास योग्य हवामान[संपादन]
या पिकासाठी उबदार व दमट हवामान उत्तम आहे. अति पाऊस होतो, तेथे याचे मळे चांगले टिकतात. क्वचितच हे मिश्र पीक म्हणूनही लावतात.
जाती[संपादन]
नागवेलीच्या दोन मुख्य जाती आहेत - कपुरी व मलबारी. बंगालमध्ये होणाऱ्या पानांना बंगला पान किंवा कलकत्ता पान म्हणतात.
बाह्य दुवे[संपादन]
हेही पहा[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |