Jump to content

पंगत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेवावयास बसलेल्या एकापेक्षा अधिक माणसांच्या ओळीस पंगत असे म्हणतात. []


आमंत्रण

[संपादन]

पारंपारिक पंगत आसन व्यवस्था

[संपादन]

पारंपारिक पंगतीत लोक जमीन, बसावयाची अंथरुणे अथवा पाटावर जेवण्यास बसत. काही पाट नक्षीदार असत. सहसा मुले, पुरुष, व स्त्रियांची आसन व्यवस्था अथवा जेवण्यास बसण्याच्या वेळेत फरक असे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जातिसंस्थेचा प्रभावही पंगतीतील आसन व्यवस्थेवर असे.

जेवण्याची थाळी मांडण्यापूर्वी रांगोळी काढली जात असे. खास प्रसंगी अथवा खास व्यक्तींसाठी थाळी चौरंगावर मांडण्यासाठी चौरंगासोबत फुलांची आरास, समई आणि उदबत्ती असत. पंगतीच्या थाळ्या म्हणून पळसाच्या पानांच्या पत्रावळी, केळीची पाने, पितळेची अथवा चांदीची ताटे यांचा उपयोग केला जात असे. प्रसंगानुपरत्वे समई आणि उदबत्तीचे स्टॅंड सुद्धा चांदीचे वापरले जात.

जेवण

[संपादन]

ताटात डावीकडे मीठ, लिंबू, चटण्या, कोशिंबिरी, त्याखाली भजी, पापड, खीर तर उजवीकडे बटाट्याची पिवळी धमक भाजी, डाळिंब्यांची उसळ, मध्यभागी पांढऱ्या भाताची मूद, त्यावर घट्ट साधे वरण व तूप, त्याच्या थोडे वरच्या बाजूला मसालेभाताची मूद असे. त्याच्या वरच्या बाजूला मऊ-लुसलुशीत पुरणपोळी व त्यावर साजूकतुपाची धार असे. श्रीखंड, गुलाबजाम यांसारखे पदार्थ वाट्यांमध्ये घालून बाजूलाच ठेवले जात. मग खड्या सुरात श्लोक म्हणत जेवणाला सुरुवात व्हायची.

संकेत

[संपादन]

आधुनिक काळातील पंगती

[संपादन]

बदलत्या काळानुसार समारंभात बसून जेवण्याची पद्धत

कमी होत चालली आहे.त्याऐवजी टेबल-खुर्ची वर बसून जेवण्याची पद्धत आली आहे.मोठ्या पंगतीमध्ये याचा फायदा जेवण वाढणाऱ्याला होतो.त्याचे काम सोपे व जलद होते.

सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]