विठ्ठल काटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विठ्ठल काटे (२२ सप्टेंबर, १९३७) हे पुण्यातील चैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी उभारलेल्या चळवळीतून महाराष्ट्रातल्या हास्यक्लबच्या १५० शाखांमध्ये सुमारे १० हजार सभासद आहेत. या संस्थेच्या पुण्याव्यतिरिक्त अहमदनगर, कोपरगांव, नारायणगांव, सातारा, वाई आदी गावांत शाखा आहेत. ही संस्था केवळ हसण्याच्या माध्यमातून छोटेमोठे आजार आणि नकारात्मक दृष्टिकोन घालविण्याचा प्रयत्न करते. या संस्थेची स्थापना १९९८मध्ये पुण्याच्या संभाजी उद्यानात झाली.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


मुळात डॉ. दिनेश कटारिया यांनी हास्यक्लबची संकल्पना आधी भारतात आणि त्यानंतर देशाबाहेरही रुजवली. त्यांच्याच मुंबईतील एका क्लबची माहिती मिळाल्यानंतर पुण्यात ‘चैतन्य योग क्लब’ चालवणाऱ्या विठ्ठल काटे यांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या सभासदांना या अनोख्या पद्धतीची माहिती दिली. तेव्हापासून चैतन्य हास्ययोग या नावाने गेली ही चळवळ शहराच्या विविध भागांत, विविध थरांमध्ये आणि आता वेगवेगळ्या वयोगटांतही रुजली आहे. या संस्थेचे फक्त पुण्यातच ११० हास्यक्लब आणि काही हजार सभासद आहेत. देशात कोणत्याच शहरात इतके क्लब किंवा सभासद नाहीत, असे विठ्ठल काटे अभिमानाने सांगतात. कोणत्याही खर्चाशिवाय ताणतणावापासून मुक्ती मिळवण्याचा हा उपाय आता सर्वांनाच पटू लागला आहे, याचेच ते द्योतक आहे.

अनेक डॉक्टर या नवचैतन्य हास्ययोग नावाच्या क्लबचे सभासद असून ते शास्त्रीय कारणांनिशी या हास्ययोगाची संकल्पना समजावून सांगतात, तेव्हा त्याचा दुप्पट परिणाम होतो. मुख्य म्हणजे महिन्याभरातच तुम्हाला त्याचे परिणाम जाणवू लागतात, असे हास्यक्लबचे सभासद सांगतात. अनेकांची गुडघेदुखी, डोकेदुखी एवढेच नव्हे तर ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहिल्याचे अनुभव ऐकायला मिळतात.

हे हास्यक्लब म्हणजे सुखवस्तू घरांमधील लाड, अशी समजूतही अनेक दिवस होती. मात्र पुण्यातील काही मंडळांनी ती चाकोरीही मोडली आहे. येरवडा, घोरपडे पेठेसारख्या भागात अनेक कनिष्ठ मध्यमवगीर्य मंडळी, एवढेच नव्हे तर झोपडपट्टीतील माणसेही या हास्यक्लबमध्ये सामील झाली आहेत. काही घरांमधील बायकाही या क्लबमध्ये सहभागी होतात. पण अशा ठिकाणी त्यांची संख्या अजून कमी आहे.

आर्थिक परिस्थिती उत्तम असलेल्या घरांमध्ये मात्र या हास्ययोगाचा सर्वाधिक फायदा महिलांना झाला आहे, असे काटे म्हणतात. घरातील सर्व टेन्शन्सखाली बाई दबलेली असते. स्वयंपाक, घराची निगराणी, मुले, सासू-सासरे, नवरा, नोकरी, नातेवाईक या सगळ्यांना सांभाळत तारेवरची कसरत करणाऱ्या महिलांनी या क्लबमध्ये मोकळा श्वास घेतला.

या हास्यक्लब्जवरचा ज्येष्ठ नागरिकत्वाचा शिक्काही पुसला गेला आहे. चैतन्य हास्ययोग मंडळाने अनेक शाळा कॉलेजांमध्ये या हास्ययोगाची ओळख करून दिली आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि पालकांसाठीही या हास्ययोगाची शिबिरे घेतली आहेत. कॉलेजांमधून मात्र अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी तरुणांना या वेगळ्या उपचारपद्धतीचे आपल्या हेक्टिक आयुष्यातील महत्त्व कळते आहे. पैसा आणि करिअरच्या मागे लागून मन:शांती हरवून बसलेल्यांना मानसिक श्रीमंती बहाल करणारा हास्ययोग पुण्यात तरी 'हेल्थ ॲन्ड स्पिरिच्युअल गुरू' बनू पाहतो आहे.

सन्मान[संपादन]

  • विठ्ठल काटे आणि पत्‍नी सुमन काटे यांना पुण्याच्या डेक्कन चेंबर ऒफ कॉमर्सचा २०१५ सालचा जीवनगौरव पुरस्कार (२१-९-२०१५)
  • पुणे महापालिकेतर्फे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठल काटे आणि त्यांच्या पत्‍नीचा विशेष सत्कार. (७-८-२०१६)
  • एका दूरचित्रवाहिनी काटे यांच्या कार्यावर एक माहितीपट बनवला आहे. २०१७ सालच्या जागतिक हास्यदिनी तो पहिल्यांदा प्रसारित झाला. (७-५-२०१७)