विकिपीडिया
उद्योग क्षेत्र | इंटरनेट, संगणक सॉफ्टवेर |
---|---|
स्थापना | जानेवारी १५, २००१ |
संस्थापक | जिमी वेल्स, लॅरी सँगर |
मुख्यालय | अमेरिका |
पालक कंपनी | विकिमीडिया फाउंडेशन |
संकेतस्थळ | विकिपीडिया |
विकिपीडिया (Wikipedia) हा महाजालावर वापरता येण्याजोगा, विविध भाषांत उपलब्ध असणारा आणि सामूहिक सहकार्यातून निर्माण होत असलेला मुक्त ज्ञानकोशांचा समूह आहे.[१]
विकिपीडिया ह्या संकेतस्थळांतर्गत जगातील विविध भाषांत[२] ज्ञानकोश वापरण्याची आणि त्यात भर घालण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विकिपीडियाचे संकेतस्थळ विकी ही आज्ञावली (सॉफ्टवेर) वापरून तयार केलेले आहे. विकी ह्या आज्ञावलीमुळे विविध व्यक्ती एकत्रितरीत्या महाजालावर काम करू शकतात.
विकिपीडिया हा ज्ञानकोश सामूहिक सहकार्यातून निर्माण करण्यात येतो. म्हणजे महाजालावरील ह्या ज्ञानकोशसमूहातील कोणत्याही ज्ञानकोशात (उदा. मराठी विकिपीडिया), सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असलेल्या लेखाचे संपादन करता येते. म्हणजेच उपलब्ध असलेल्या एखाद्या लेखात भर घालता येऊ शकते, त्यातील मजकूर सुधारता येऊ शकतो. जर एखाद्या विषयावर लेख उपलब्ध नसेल तर नव्याने लेख लिहिताही येतो.
विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचा निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना, ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.[३]
विकिमीडिया फाउंडेशन ही ना-नफा ना-तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत.[४][५] विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषा यातील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.
मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७१५ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत, जगातील विविध भाषांत मिळून, आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख लिहीले गेले आहेत.
विकिपीडियाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपीडिया इतर भाषांप्रमाणेच गुगल सारखी शोधयंत्र वापरून शोधता येतो.
विकिपीडियाचा इतिहास
[संपादन]जिमी वेल्स आणि लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्लिश भाषेत केली.[६]
विकिपीडियाची वैशिष्ट्ये
[संपादन]- विकिपीडिया:परिचय
- विकिपीडिया एवढा खास का आहे? (इंग्रजी आवृत्ती)
- नवागतांचे स्वागत (इंग्रजी आवृत्ती)
- विकी
- इंग्रजी विकिपीडिया ओळख (इंग्रजी आवृत्ती)
- सहाय्य:Setup For Devanagari
- विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन
- नवीन लेख कसा लिहावा
- विकिपीडिया साहाय्य:संपादन
- विकिपीडिया:सफर
- विकिपीडिया:धोरणांची व मार्गदर्शक तत्त्वांची सूची
- विकिपीडियाचे पाच आधारस्तंभ (इंग्रजी आवृत्ती)
बाह्य दुवे
[संपादन]- अलेक्सा पेज रँक Archived 2007-10-09 at the Wayback Machine.
- गुगल ट्रेंड
- मराठी आणि विकिपीडिया तौलनिक गुगल ट्रेंड
- User page about ChaTo/Temporal Evolution of the Wikigraph
मनोगत
[संपादन]- मराठी विकिपीडयाची आगेकूच[permanent dead link]
- मराठी विकिपीडिया
- मराठी विकिपीडिया वरील आत्ता पर्यंतचे ५० मोठे लेख
संदर्भ
[संपादन]- ^ विविध विकिपीडियांची सूची.
- ^ विकिपीडियांची भाषावार सूची.
- ^ विकिपीडियावरील सामग्री वापरण्यासाठीच्या अटी.
- ^ विकिपीडियाचे मुख्य पान
- ^ विविध भाषांतील विकिपीडियांची यादी
- ^ कॉक, नेड व युंग, युसुन आणि सिन, टी.; विकिपीडिया ॲण्ड इ-कोलॅबरेशन रीसर्च : ऑपॉर्च्युनिटीज ॲण्ड चॅलँजेस; इंटरनॅशनल जर्नल ऑफ इ-कोलॅबरेशन; १२(२), १-८
संदर्भसूची
[संपादन]- विकिपीडियांची भाषावार सूची (इंग्लिश भाषेत). p. https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias_by_language_group. ११ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- विकिपीडियावरील सामग्री वापरण्यासाठीच्या अटी (इंग्लिश भाषेत). p. https://foundation.wikimedia.org/wiki/Terms_of_Use/en. ११ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- विविध विकिपीडियांची सूची (इंग्लिश भाषेत). p. https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias. ११ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)