विकिपीडिया चर्चा:विकिमीडियाचा भारतीय स्कन्ध

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Mahitgar:,

हा लेख विकिपीडिया नामविश्वात स्थलांतरित करावा का?

अभय नातू (चर्चा) २०:२२, १० सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

तसे पहाता वृत्तपत्रीय संदर्भ घेत ज्ञानकोशीय लेखन करण्याच्या मूड मध्ये असताना लिहिल्यामुळे लेख नामविश्वात लिहिला. विकिपीडिया नामविश्वात ढकलण्यास हरकत आहे असेही नाही.
पण मला वाटते वस्तुत: दोन्हीची स्वतंत्र गरज आहे. मराठी विकिपीडियाची माहिती विकिपीडीया नामविश्वात आणि लेख नामविश्वात जसा फरक पडेल तसेच येथेही असावे असे वाटते. काही गोष्टी दोन्ही लेखात ओव्हरलॅपही होऊ शकतील पण एकुण कव्हरेज एकसारखे राहील असे वाटत नाही. लेख नामविश्वातील लेख उल्लेखनीयतेच्या निकषावर उतरतो असे वाटल्यास तसा तो असावयास हवा असे वाटते. स्वतंत्र माध्यमात विकिमिडीया इंडियाचे कव्हरेज ज्ञानकोशीय लेखाच्या स्वरुपात कव्हर करणे गरजेचे आहेच. वृत्तपत्रांनी एखाद्या उपक्रमाची घेतलेली विशेष दखल अथवा केलेली टिका (माझ्या अजून तरी टिका पहाण्यात आली नाही) तर ती विकिपीडिया नामविश्वातील साहाय्य पानावर प्रस्तुत ठरणार नाही पण लेख नामविश्वात प्रस्तुत ठरेल.
उलटपक्षी मेंबरशीप कशी घ्यावी मेंबरशीप घेण्याचे फायदे फीस, निवडणूक या गोष्टी विकिपीडिया नामविश्वात फिट बसतील पण लेख नामविश्वात फिट बसणार नाहीत.
विकिपीडिया नामविश्वात लिहिण्याची गरज आहे पण साहाय्यपानाच्या दृष्टीने माझ्याकडून लगेच किती वेळ दिला जाऊ शकेल या बद्दल शंका आहे. तुम्ही नामविश्व बदलल्यास खूप हरकत आहे असेही नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१६, १० सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

चॅप्टर शब्दास मराठी शब्द सुचवून हवा आहे[संपादन]

विकिमिडीया इंडिया चॅप्टर मधील चॅप्टर या शब्दास चपखल मराठी शब्द सुचवून हवा आहे. लेख लिहिताना 'चॅप्टर असणे'ची विनोदी छटा सातत्याने आठवत राहील्याने मी त्याचा अनुवाद करण्याचे ठरवले. स्वायत्त असल्यामुळे शाखा branch हा शब्द वापरणे कठीण जाते. म्हणून संस्कृत शब्दकोशातून शोधून स्कन्ध शब्द तुर्तास वापरला आहे पण तोच वापरावा असा आग्रह नाही. हिंदीत अध्याय असा शब्दश: अनुवाद करतात. मराठीत अनुवाद कसा करतात अथवा करावा हे माहित नाही. सुचवावे अशी नम्र विनंती
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१६, १० सप्टेंबर २०१७ (IST)[reply]