विकिपीडिया:अथॉरिटी कंट्रोल
लघुपथ: WP:VIAF
हे माहितीचे पान आहे. ते, विकिपीडियाचे नॉर्मस् व प्रघात यातील काही बाबींवर असलेली संपादक-समाजाची एकवाक्यता दर्शविते. यात विकिपीडियाची नीती किंवा मार्गदर्शक तत्त्वे अंतर्भूत नाहीत. |
अथॉरिटी कंट्रोल ही प्रत्येक विषयास अनन्य शीर्षक देण्यासाठीची एक पद्धत आहे.ती साधारणतः विकिपीडियाच्या निःसंदिग्धीकरण व पुनर्निर्देशने पद्धतीसारखीच आहे.ती त्या विषयांसाठी/व्यक्तिंसाठी निर्णायक आहे ज्यात एकसारखीच नावे असतात पण त्यांनी हाताळलेले व संदर्भांकित विषय वेगवेगळे असतात. ज्याप्रमाणे John Smith (professor) and John Smith (English poet), यामध्ये फरक करणे व तसेच, वेगवेगळे मथळे असणारे विषय, पण ते एकाच विषयाकडे/व्यक्तिकडे निर्देश करतात, जसे, मार्क ट्वेन व सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स .
{{Authority control}} साचा हा विकिपीडियातील लेखांना व सदस्यपानांना, जगभरातील संबंधित राष्ट्रीय ग्रंथालये, ग्रंथालय सूची व इतर अथॉरिटी संचिकांमधील प्रविष्ट्यांशी दुवे जोडतो.यातील प्रविष्ट्या ह्या, वैशिष्ट्यपूर्ण रितीने, व्यक्ति, पुस्तकांची शीर्षके व तत्सम सुव्याख्यात(वेल डिफाइंड) अस्तित्वांशी संलग्न व संबंधित असतात.
सप्टेंबर २०१७ च्या मोजणीनुसार[अद्यतन करा], इंग्रजी विकिपीडियात {{Authority control}} साचा लावलेले ५,२६,००० लेख आहेत. तर मराठी विकिपीडियात २९ लेख आहेत.
जोडलेल्या ग्रंथसूच्या
[संपादन]हा साचा खालील अथॉरिटी संचिकांबाबतच्या ओळखणी(आयडेंटिफायर्स) दर्शवू शकतो: जीएनडी (जर्मन राष्ट्रीय ग्रंथालय व सहभागी संस्था, एलसीसीएन (लायब्ररी ऑफ काँग्रेस), एसइएलआयबीआर (म्हणजेच एलसीसीएन) (स्वीडनचे राष्ट्रीय ग्रंथालय), व्हीआयएएफ (ऑनलाईन कॉम्प्युटर लायब्ररी सेंटरची व्हर्चुअल इंटरनॅशनल अथॉरिटी फाईल, ओआरसीआयडी (ओपन रिसर्चर अँड कॉन्ट्रिब्युटर आयडी) व अधिक. (३०+ स्रोत, विभाग:Authority control#प्राचलांची नावे व संलग्न विकिडाटा गुणधर्म येथील यादी बघा). व्हीआयएएफ हे जवळपास २० राष्ट्रीय ग्रंथालयांतून व इतर अथॉरिटी संचिकांमधून, जसे,यूएलएएन, अथॉरिटी दप्तर(रेकॉर्डस्) एकत्र करते.
उद्देश
[संपादन]राष्ट्रीय व इतर गंथालये आर्चिव्हज् व संकलन हे एखाद्या विशिष्ट व्यक्तिने केलेल्या कामांचे दुवे जोडण्यासाठी अथॉरिटी रेकॉर्डस वापरतात. त्या व्यक्ति एकतर त्या कामाच्या निर्माणात गुंतलेल्या असतात अथवा त्या विषयाशीच थेट संबंधित असतात.अशी कामे ही पुस्तके, कॉमिक्स,संगीत आल्बम्स, सर्व प्रकारचे व्हीडिओ (चित्रपट,डॉक्यूमेंटरीज,टीव्ही मालिका) चित्रकला, हस्तलिखीते आदी असू शकतात.
वाचकांना असलेला फायदा म्हणजे, जेथे उपलब्ध असेल तेथे, या जोडलेल्या एकत्रित कामांना त्यांची असलेली थेट पोहोच होय.(उदा. ते ग्रंथालय शोधणे ज्यात एखाद्या विषयावरील विशिष्ट पुस्तक आहे.)
सुरुवात म्हणून, इंग्रजी विकिने अथॉरिटी कंट्रोल डाटा हा चरित्रात्मक लेखांसाठी वापरला. अथॉरिटी संचिकांतुन व्यक्तिंची माहिती घेण्यावर बंधन नाही. यापैकी काही संचिकात, संस्थेबद्दलची माहिती, भौगोलिक नावे, कामाची शीर्षके किंवा सामान्य विषयाच्या बाबी किंवा कळीचे शब्द असतात.
विकिपीडियातील लेखांना अथॉरिटी कंट्रोल डाटा जोडल्याने,विकिमिडिया व ग्रंथालय समुदाय संचेतन विकसक हे, विकिपीडियावरील, डाटाबेसमधील व ऑनलाईन कॅटलॉग, जे ह्या ओळखणी वापरतात, त्यामधील माहितीस एकत्रित करण्यास व त्यांना दुवे जोडण्यास नविन साधने तयार करू शकतील.अशी साधने ही BEACON हे जर्मन विकि समुदायाने तयार केलेले संचिका प्रारूप व डायनॅमिक लिंक वापरुन, बाह्य दुव्यांशी जोडल्या जाणे शक्य करू शकतात.
साच्याचा वापर कसा करावा
[संपादन]स्थिती
[संपादन]मेटाडाटा साचा म्हणून, अथॉरिटी कंट्रोल साचा हा बाह्य दुवे यानंतर व सुचालन साचे यानंतर लावण्यात यावा.
एकास एक (१ः१) अनुपात व नेमकी तशीच अनुरूपता नसणारे
[संपादन]अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात विकिपीडिया मधील मजकूर हा अथॉरिटी कंट्रोल प्रणालीशी जुळत नाही.(उदाहरणार्थ:Category:Redirects from pseudonyms बघा. एकापेक्षा अधिक नावे अथवा टोपणनावे असणाऱ्या व (Category:Articles about multiple people अनेकविध नावे असणाऱ्या व्यक्तिंचे लेख) हे बघा. अशा प्रकरणात,{{Authority control}} हा साचा त्या पानात (लेख अथवा पुनर्निर्देशन) लावण्यात यावा जे पान/लेख अथॉरिटी कंट्रोल प्रणालीतील संबंधित विषयाशी अधिकतम जुळते.आवश्यक असेल तर, एखादे नविन पुनर्निर्देशन तयार करा.Wikipedia:Redirects are cheap.
प्राचले
[संपादन]आयएसएनआय
[संपादन]आयएसएनआय (इंटरनॅशनल स्टॅंडर्ड नेम आयडेंटिफायर) ही ओळखण आयएसओ मानकांवर आधारीत आहे.
व्हीआयएएफ
[संपादन]एखाद्या लेखाच्या विषयाशी संबंधित व्हीआयएएफ ओळखण व्हीआयएएफ,ऑर्ग येथे मिळू शकते. यात जगभरातील अनेक संस्थांचा अथॉरिटी रेकॉर्ड सामावलेला आहे. तो एकाच डाटासेटमध्ये आहे. हव्या असलेल्या व्यक्तिचे नाव शोधक्षेत्रात टाका व त्याचेशी संबंधित डाटासंच शोध-निकालात बघा. त्याची व्हीआयएएफ ओळखण यादीच्या खालच्या बाजूस सापडेल.
जर एखाद्या विशिष्ट व्यक्तिच्या विविध अथॉरिटी रेकॉर्डस मधील प्रविष्ट्या एका डाटासंचात विलीन केल्या नसतील, तर, त्या विषयाची व्हीआयएएफ ओळखणीत असलेली एलसीसीएन वापरा.लवकरच अथवा नंतर, व्हीआयएएफ ही एका डाटासंचात विलीन केल्या जाईल व जून्या ओळखणींपासून यान पुनर्निर्देशन असेल.
जीएनडी (पूर्वीचे पीएनडी)
[संपादन]जीएनडी रेकॉर्डस व्हीआयएएफ.ऑर्ग मार्फतही शोधल्या जाऊ शकतात. त्यावर "DNB" (Deutsche Nationalbibliothek) अशी खूण असते.व्हीआयएएफ डाटासंचातील जीएनडी प्रविष्ट्या ह्या जर्मन राष्ट्रीय ग्रंथालयातील ऑनलाईन कॅटॅलॉगशी जोडालेल्या असतात.जीएनडी रेकॉर्डस मध्ये, ओळखण ही "Link zu diesem Datensatz" या क्षेत्रात सापडू शकते,("http://d-nb.info/gnd/170118215" म्हणजे ज्या ओळखणीचा जीएनडी क्रमांक 170118215 आहे).याची नोंद घ्या कि फक्त चरित्रात्मक रेकॉर्डस ज्यात नाव क्षेत्रात "Person" अशी खूण आहे, हे वैध जीएनडी रेकॉर्डस आहेत.ते या साच्यात वापरल्या जाऊ शकतात.जर नाव-क्षेत्रात(फिल्ड) "Name" अशी खूण असेल तर, तो विशिष्ट रेकॉर्ड हा व्यक्तिगत केल्या गेला नाही.याचा अर्थ असा कि एकसारख्या नावाच्या वेगवेगळ्या लेखकांची प्रकाशने त्यात आहेत.व्हीआयएएफ मध्ये, असे वैयक्तिक नसलेल्या रेकॉर्डसवर (undifferentiated) अशी खूण असते.
पोर्टल.डीएनबी.डीई या पोर्टलवर थेट शोधण्याची अजून एक पद्धत आहे. आपण आपले शोध निकाल हे "Alle Normdaten" या उजव्या बाजूच्या मथळ्याखाली असलेल्या दुव्यांवर मर्यादित ठेवू शकता.व्यक्तिंबाबतच्या अथॉरिटी कंट्रोल डाटासाठी "Personen" वर टिचका.
एसइएलआयबीआर
[संपादन]स्वीडनच्या राष्ट्रीय ग्रंथालयाद्वारे वापरण्यात येणारी ओळखण ही व्हीआयएएफ.ऑर्ग मार्फतही शोधल्या जाऊ शकते. व्हीआयएएफ डाटासेटमधील अशा ओळखणी ह्या लिब्रिस.केबी.एसइ मधिल अथॉरिटी कंट्रोल रेकॉर्डससोबत जोडलेल्या असतात. जालपत्त्यातील शेवटी असणाऱ्या आकड्याची नकल करा व ती साच्यात असणाऱ्या 'एसईएलआयबीआर' या प्राचलात डकवा.
एसडब्ल्यूडी व जीकेडी
[संपादन]एसडब्ल्यूडी व जीकेडी हे सध्याच्या जर्मन जीएनडी या संचिकेचे पूर्ववर्ती आहेत.त्यात कळीचे शब्द,संस्था, घटना/उपक्रम इत्यादी आहेत. या ओळखणी सध्या इंग्रजी विकिवर फारच थोड्या लेखात वापरल्या जात आहेत. एसडब्ल्यूडी व जीकेडी हे सन २०१२ मध्ये जीएनडीमध्ये विलीन झाले म्हणून, ही प्राचले सध्या वापरण्यात येऊ नयेत.[स्पष्टीकरण हवे]
- साचा:Question
- झाले. Please use the "winning" authority file. For example the former GKD in the case of corporate bodies (see: de:Hilfe:GND#Dubletten: Gewinnerdatensätze).
ओआरसीआयडी
[संपादन]ओआरसीआयडी (ओपन रिसर्चर अँड काँट्रिब्युटर आयडी - इं.:Open Researcher and Contributor ID) हा एक विना-मालकी(nonproprietary) अक्षरांकयुक्त संकेत आहे जो, अनन्यरित्या वैज्ञानिक व इतर विद्याविषयक लेखकांची ओळखण करतो.कोणीही लेखक- विकिपीडियाच्या लेखकांसह - ओआरसीआयडी घेऊ शकतात. त्यासाठी ओआरसीआयडी.ऑर्ग या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल.
अधिक माहितीसाठी en:WP:ओआरसीआयडी बघा.
एमबीए
[संपादन]'म्यूझिकब्रेंझ' अथवा एमबीए ही संगीताच्या विश्वकोशातील म्यूझिकब्रेंझ एक खुली/ मुक्त ओळखण आहे.जर आपणापाशी म्यूझिकब्रेंझ वरील कलाकाराच्या ओळखणीचा दुवा असेल तर, त्या दुव्याचा शेवटला भाग हा त्या कलाकाराची ओळखण आहे.
उदाहरणे
[संपादन]एखाद्या लेखात फक्त {{Authority control}}
हा साचा लावण्याने, विकिडाटा मधील त्या लेखाशी संलग्न सर्व अथॉरिटी कंट्रोल माहिती त्यात दर्शविल्या जाईल.विकिडाटामधील माहितीचे व्यवस्थापन, याची खात्री देते कि, ती माहिती इतर भाषांत व इतर प्रकल्पात देखील उपलब्ध आहे. याच्या संपूर्ण माहितीसाठी साचा:Authority_control#Wikidata हे बघा.
जर आपण स्वतः ही माहिती टाकू इच्छित असाल तर, येथे काही उदाहरणे दिली आहेत:
- स्टीवन किंग:
{{Authority control|ISNI=0000 0001 2144 6296|GND=118813250|LCCN=n/79/63767|VIAF=97113511}}
- अॅल्बर्ट आइन्स्टाइन:
{{Authority control|ISNI=0000 0000 7704 0933|GND=118529579|LCCN=n/79/22889|VIAF=75121530}}
- बराक ओबामा:
{{Authority control|ISNI=0000 0001 2133 1026|GND=132522136|LCCN=n/94/112934|VIAF=52010985}}
- जॉन विलबॅंक्स:
{{Authority control|ORCID=0000-0002-4510-0385}}
- सॅरा पेलिन:
{{Authority control|VIAF=7159878}}
व्हीआयएएफशी संपर्क
[संपादन]आम्ही व्हीआयएएफच्या प्रतिनिधींना परस्पर स्वारस्यासाठीच्या चर्चेसाठी बोलाविले होते. कृपया en:Wikipedia talk:Authority control/VIAF बघा.