Jump to content

मार्क ट्वेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सॅम्युएल लॅंगहॉर्न क्लेमेन्स
जन्म नाव सॅम्युएल लॅंगहॉर्न क्लेमेन्स
टोपणनाव मार्क ट्वेन
जन्म नोव्हेंबर ३०, १८३५
फ्लोरिडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यू एप्रिल २१, १९१०
रेड्डिंग, कनेटिकट
राष्ट्रीयत्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कार्यक्षेत्र साहित्य
साहित्य प्रकार प्रवास वर्णने, लघुकथा, लहान मुलांसाठी गोष्टी
प्रसिद्ध साहित्यकृती The Adventures of Tom Sawyer, Adventures of Huckleberry Finn
प्रभाव चार्ल्स डिकेन्स
वडील John Marshall Clemens
आई Jane Lampton Clemens
पत्नी Olivia Langdon Clemens
मार्क ट्वेन (1909)

मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा एक अमेरिकन लेखक होता.

जीवन[संपादन]

  • The Adventures of Tom Sawyer‎ हे मार्क ट्वेनचे मुलांसाठी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक. या पुस्तकाचे 'टाॅम सायरची साहसं' या नावाचे मराठी भाषांतर अवधूत डोंगरे यांनी केले आहे.
  • The Adventures of Huckleberry Finn हे मार्क ट्वेनचे मुलांसाठी लिहिलेले दुसरे प्रसिद्ध पुस्तक. या पुस्तकाचे 'हकलबरी फिनची साहसं' या नावाचे मराठी भाषांतरही अवधूत डोंगरे यांनी केले आहे.

इंग्रजी लिपीतील सुधारणा[संपादन]

मार्क ट्वेनने इंग्रजी लिपीतल्या सुधारणांबद्दल गमतीदार सूचनांचा एक परिच्छेद लिहिला आहे, तो असा :

"In Year 1 that useless letter 'c' would be dropped to be replased either by 'k' or 's', and likewise 'x' would no longer be part of the alphabet. The only kase in which 'c' would be retained would be the 'ch' formation, which will be dealt with later. Year 2 might reform 'w' spelling, so that 'which' and 'one' would take the same konsonant, wile Year 3 might well abolish 'y', replasing it with 'i', and Iear 4 might fiks the 'g/j' anomali wonse and for all. Jenerally, then, the improvement would kontinue iear bai iear with Iear 5 doing awai with useless double konsonants, and Iears 6 and 12 or so modifaiing vowlz and the rimeining voist and unvoist konsonants. Bai Iear 15 or sou, it wud fainali bi posibl tu meik ius ov thi ridandant letez 'c', 'y', and 'x' -bai now jast a memori in the maindz ov ould doderez- tu riplais 'ch', 'sh', and 'th' rispektivli. Fainali, xen, aafte sam 20 iers ov orxogrefkl riform, wi wud hev a lojikl, kohirnt speling in ius xrewawt xe Ingliy-spiking werld"


स्वामित्वधनाचा प्रश्न[संपादन]

त्या काळी लेखकांच्या स्वामित्वधनाचा प्रश्न अमेरिकेत गाजत होता. अनेक प्रकाशक लेखकाला न विचारता त्याची पुस्तके प्रसिद्ध करत. त्यामुळे प्रकाशकांचा चांगलाच फायदा होत असे तर लेखकाला काहीच मिळत नसे. अमेरिकी सरकारचे स्वामित्वधनविषयक कायदे लेखकांच्या साठी सोयीचे नव्हते. तत्कालीन कायद्याने पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर ४२ वर्षे लेखकाचा त्यावर हक्क मानला जात होता. ट्वेनने या कायद्याच्या विरोधात अनेक लेख लिहिले व भाषणे केली. डिसेंबर १९०६ मध्ये ‘लायब्ररी ऑफ अमेरिकन काँग्रेस’च्या सभेत लेखकांच्या स्वामित्वधनाच्या मुद्द्यावर ट्वेन यांना साक्ष देण्यासाठी बोलावले होते. लेखकाच्या मृत्यूनंतर किमान ५० वर्षे पुस्तकाच्या स्वामित्वाचे हक्क त्याच्या वारसाकडे राहिले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी तिथे केली.


विकिक्वोट
विकिक्वोट
मार्क ट्वेन हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.