Jump to content

युनिक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विकासाची स्थिती सक्रिय
प्रोग्रॅमिंग भाषा बी, सी
भाषा इंग्लिश
सॉफ्टवेअरचा प्रकार संगणक संचालन प्रणाली
सॉफ्टवेअर परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ युनिक्स.ऑर्ग

युनिक्स (अधिकृत ट्रेडमार्क UNIX®) संगणक प्रणाली सर्वप्रथम बेल प्रयोगशाळेतील कर्मचाय्रानी १९६९ मध्ये बनविली. यात केन थॉमसन, डेनिस रिची आणि डग्लस मॅक्लिरॉय इत्यादींचा समावेश होता. युनिक्स ही सी या प्रोग्रामिंग लॅंग्वेजमध्ये लिहिलेली सिस्टीम आहे. युनिक्स या सिस्टिमवर एकाच वेळी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतात. संगणकाच्या प्रकारावर किंवा त्यातील हार्डवेअरवर ही सिस्टीम अवलबून नसते.

युनिक्सचे तीन मुख्य भाग पडतात. कर्नल, शेल आणि युटीलीटीज.

कर्नल

[संपादन]

कर्नल (इंग्लिश भाषा:kernal) हा सिस्टीमचा सर्वात आतील महत्त्वाचा भाग (गाभा) होय. हा भाग मशीनच्या मेमरीचे व्यवस्थापन करतो. सीपीयुच्या कामाचे व्यवस्थापन करतो, जेणेकरून प्रत्येक युजर आपले काम व्यवस्थितपणे करू शकेल, डेटाचे वहन करण्यास मदत करतो व शेल कडून येणाच्या सूचनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे काम करून घेतो.

शेल (इंग्लिश भाषा:shell) हा भाग येणारी प्रत्येक सूचना कर्नल कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठवतो व त्याची उत्तरे परत मॉनिटरवर दाखवतो. युनिक्स सिस्टीम सुरुवात झाल्यानंतर स्क्रीनवर शेलचा एक कमांड प्रॉम्ट दिसू लागतो. या प्रॉम्प्टनंतर तुम्हाला तुमच्या सूचना टाईप करता येतात.

युटीलीटीज

[संपादन]

युटीलीटीज (इंग्लिश भाषा:utilities) या भागामुळे सिस्टिममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देता येतात.

संदर्भ

[संपादन]