विकिपीडिया:सदर/मे १०, २००६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अजिंठा लेण्यांमधले एक चित्र

अजिंठा-वेरूळची लेणी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन कालात निर्मिलेली लेणी आहेत. ही लेणी त्यांच्या स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत.


अजिंठा

इतिहास प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षीत आश्रय स्थान उपलब्ध व्हावे असा असे. सोबतच त्यांना राजाश्रय, धर्माश्रय, लोकाश्रय प्राप्त असे. अजिंठा जवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. वेळ जाता त्याचे रुपांतर एक नितांतसुंदर अश्या चित्रकला व शिल्पकला दालनांत झाले. परंतु या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षणसंस्थेसारखी आहे.


वेरूळ

महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० कि.मी. अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगांव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौध्द, १७ हिंदु आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत.

इतिहास वेरूळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौध्द, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.

अजून वाचा...