Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/ऑक्टोबर २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॅरिस महानगराचे विहंगम दृष्य
पॅरिस महानगराचे विहंगम दृष्य

पॅरिस (फ्रेंच: Paris Fr-Paris.oga पारि ) ही फ्रान्स देशाची राजधानी व सगळ्यांत मोठे शहर आहे. उत्तर फ्रान्समध्ये इल-दा-फ्रान्स ह्या प्रांतात सीन नदीच्या काठावर वसलेले पॅरिस महानगर (फ्रेंच: Région parisienne) युरोपातील सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांपैकी एक आहे.

राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा ह्या सर्व क्षेत्रांत फ्रान्समध्ये अग्रेसर असणारे पॅरिस हे एक महत्त्वाचे जागतिक शहर मानले जाते. येथे युनेस्को, आर्थिक सहयोग व विकास संस्था इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालये आहेत.

पॅरिस महानगराचे एकूण उत्पन्न ५५२.७ अब्ज युरो एवढे असून ते युरोपामध्ये सर्वांत जास्त तर जगात सहाव्या क्रमांकावर आहे. २०१० साली घेण्यात आलेल्या एका अहवालानुसार पॅरिस हे जगातील सर्वांत महागडे शहर आहे. २००९ व २०१० साली पॅरिसला जगातील सर्वोच्च ३ महत्त्वाच्या व प्रभावशाली शहरांमध्ये स्थान मिळाले आहे. २०२० व २०२५ सालांमधील जगातील १० सर्वांत श्रीमंत व समृद्ध शहरांमध्येदेखील पॅरिसचा उल्लेख आहे. ह्या गटातील इतर शहरे शांघाय, साओ पाउलो, टोकियो, न्यूयॉर्कलंडन ही आहेत.

पॅरिस हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दरवर्षी अंदाजे ४.५ कोटी लोक भेट देतात. जगप्रसिद्ध आयफेल टॉवरलूव्र संग्रहालय तसेच इतर अनेक ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये व उद्याने पॅरिसमध्ये आहेत.

पुढे वाचा...