Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/एप्रिल २०११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. २०११ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी १९ ते एप्रिल २, २०११च्या दरम्यान भारत, श्रीलंकाबांगलादेशमध्ये खेळवण्यात येईल. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात येतील. १७ फेब्रुवारी रोजी उद्घाटन सोहळा होउन १९ फेब्रुवारीला पहिला सामना भारतचा ध्वज भारत आणि बांगलादेशचा ध्वज बांगलादेशमध्ये ढाका येथे शेर-ए-बांगला मैदानात खेळला गेला. प्रत्येकी सात संघ असलेल्या दोन गटांत साखळी सामने झाल्यावर त्यांतील सर्वोच्च चार-चार संघानी बाद फेरीत भाग घेतला. एप्रिल २ रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्त्वाखाली भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले. यजमान संघाने विश्वविजेतेपद जिकण्याची ही प्रथमच वेळ आहे.

या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण २००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले. पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले. पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले.

या स्पर्धेत आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडने इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा केलेला पराभव सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल होता. आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायनने ६३ चेंडूत ११३ धावा काढीत विश्वचषकांतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मॅथ्यू हेडनचा विक्रम आपल्या नावावार करुन घेतला. श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने स्पर्धेत सर्वात जास्त ५०० धावा काढल्या तर भारताच्या झहीर खान आणि पाकिस्तानच्या शहीद आफ्रिदीने प्रत्येकी सगळ्यात जास्त बळी (२१) मिळवले. युवराजसिंग स्पर्धावीर ठरला.

पुढे वाचा...