विकिपीडिया:मराठवाडा दालन/विशेष लेख/फेब्रुवारी २०१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Crystal Clear action bookmark.png

होट्टल येथील शिल्पसंपदा

सिध्देश्वर मंदिर होट्टल.jpg

होट्टल येथील चालुक्यकालीन मंदिरे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असलेल्या होट्टल गावातील चालुक्यकालीन मंदिरे व शिल्पस्थापत्य अवशेष आहेत. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असणारे होट्टल हे गाव चालुक्यकालीन शिल्पस्थापत्य अवशेषांचे आगारच आहे. या गावात अनेक मंदिरे चालुक्यांच्या राजवटीत बांधली गेलेली होती. त्यामध्ये सिद्धेश्वर, परमेश्वर, महादेव, सोमेश्वर, रोकबेश्वर, त्रैपुरुषदेव या मंदिरांचा समावेश होतो. यातील काही मंदिरे आजही चांगल्या स्थितीत आहेत तर काही उध्वस्त झालेली तर काही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. एका दृष्टीने ही मंदिरनगरी म्हणून चालुक्य काळात अस्तित्वात असावी. मंदिरस्थापत्याचा अप्रतिम अविष्कार येथे पहायला मिळतो. होट्टल येथील शिल्पसंपदा फक्त मराठवाड्याचीच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची सौभाग्यलेणी ठरावीत अशी आहे.

आणखी वाचा