विकिपीडिया:धूळपाटी/मराठी - आव्हान आणि उत्क्रांती
14.97.57.22 २१:३९, १८ जानेवारी २०१५ (IST)मागील शतकात ज्ञान, विज्ञान आणि इतर क्षेत्रातील प्रगती अमेरिकेसारख्या इंग्रजी भाषक, सधन देशात घडल्याने ती आत्मसात करण्यासाठी जगभरातील इतर भाषकांना इंग्रजी शिकणे भाग पडले. गेल्या काही दशकात प्रसार आणि संपर्क माध्यमांची झपाट्याने वाढ झाल्याने जगभरातील श्रोत्यांपर्यंत आपले विचार पोहोचविण्यासाठी इंग्रजी भाषेचा आश्रय घेणे भाग पडले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संपर्कासाठीच नव्हे, तर इंग्रजी मातृभाषा नसलेल्या समाजातही व्यवहारामध्ये इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्यामुळे इंग्रजी शब्दांची मिसळ जवळजवळ प्रत्येक भाषेत होत आहे.(हे सध्या व्यक्तीगत मत आहे सुयोग्य संदर्भांकरता राजकारणातल्या लोकांचे संदर्भ वापरणे टाळावे भाषा अभ्यासकांचे संदर्भ वापरावेत विश्वकोशीय ढाचात बसवता येईल.) अशा सरमिसळीनेच विविध भाषांच्या भाषकांना आपल्या भाषेचे वैशिष्ट्य हरविणार का? (सध्या व्यक्तीगत मताचे स्वरूप आहे दुसरे या वाक्याने तुम्ही वाचकांशी सऱळ संवाद साधूपहात आहात असा आभास होतो तो टाळावा, पण एकुण हा दॄष्टीकोण मराठी अभ्यासकांचे सुयोग्य संदर्भ दिले गेल्यास भाषेची झीज या अंगाने मांडता येणे शक्य आहे अशी शंका येणे स्वाभाविकच आहे. आपल्यालाही मराठीच्या बाबतीत हा प्रश्न पडतो आणि (आत्मचिंतन आणि वाचकाशी संवाद) दोन प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात ( दोन प्रकारच्या प्रतिक्रीया असतात आणि हा संदर्भ असे स्वरूप हवे).
एक प्रतिक्रिया अशी की, इंग्रजीच्या वर्चस्वामुळे मराठीत घडत असलेले बदल मराठी संस्कृती, आपले मराठीपण, मराठी भाषक म्हणून स्वतंत्र अस्तित्व, यांना धोकादायक आहेत; तर दुसरी प्रतिक्रिया अशी की भाषेमध्ये कालौघात होणारे बदल, भाषेची उत्क्रांती या गोष्टी टाळता येणार नाहीत म्हणून त्या बदलांशी जुळते घेणेच योग्. त्याहून पुढे जाऊन, भाषिक सरमिसळीने भाषा अधिक समृद्धच होते. इंग्रजी भाषकांनी नाही का जगभरच्या अनेक भाषांतील शब्द सामावून घेतले? (परिच्छेदास संदर्भ हवा आणि प्रश्नार्थक वाक्या एवजी साधे वाक्य वापरावे म्हणजे वाचकाशी संवाद साधल्या सारखे होणार नाही.)
ह्या दुसऱ्या प्रतिक्रियेला उत्तर असे की, मराठीच नव्हे तर प्रत्येकच भाषा तिच्या भाषिकांच्या इतिहासाचे फलित असते, तो इतिहास त्या त्या लोकांच्या मानसिकतेचे फलित असते. ही मानसिकता काळानुरूप बदलांसह पण सुसंगतपणे पुढील पिढ्यांकडे पोहोचविण्यासाठी भाषा हे वहनाचे माध्यम असते. मूळ भारतीय- युरोपियन भाषांतून फुटलेल्या प्राकृत महाराष्ट्रीपासून आमच्या भाषेची परंपरा सुरू होते. मराठी भाषा सहाव्या सातव्या शतकापासून तरी नक्कीच बोलली जात होती, कारण तिचा आठव्या शतकातील कागदोपत्री उपयोग आढळून आला आहे. ९८३ च्या पंढरपूरचा शिलालेख मराठीचा सरसहा वापर आणि राज्यकारभारात केलेला वाढता उपयोग दाखवून देतो. अशा राजाश्रयानेच मराठीत ज्ञानेश्वरी व इतर उत्तम संतवाङ्मयाची निमिर्ती झाली. संतांचे तत्वचिंतन सामान्य संसारी माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यापुढे मराठी भाषा घडली असे म्हणावयास हरकत नाही. मराठी माणसाला डोळस श्रद्धा संतांनी मराठीतूनच शिकविली. ती डोळस श्रद्धा महाराष्ट्र धर्माचे, मराठी संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. तीत प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा सुंदर संगम घडला आहे. त्या श्रद्धेतूनच रायरेश्वरासमोरील शपथेपासून महाराष्ट्राचे पुनरुत्थान सुरू झाले आणि मराठी इतिहासातील सुवर्णमय कालखंड घडला.(प्रतिक्रीयेस उत्तर हे मुळ संशोधन ओरीजनल रिसर्च म्हणून विकिपीडियावर स्विकार्ह ठरत नाही पण समान लेखकांचे याच मुद्यास अनुसरून काही लेखन असल्यास ते मराठी भाषेचा इतिहास अथवा महाराष्ट्राचा इतिहास अशा लेखात संदर्भा सहीत नमुद करता येऊ शकते.)
इतिहासातील योगायोगाने त्याच काळात[ कालसापेक्षता टाळा]
परकीय आक्रमणे देशावर झाली आणि महाराष्ट्राने त्याविरुद्ध सतत लढा दिला. तो देशभरातील क्रांतिकारकांना स्फूतीर्दायक ठरला.'(खर आहे पण संदर्भ हवा, नाहीतर ते तुमच व्यक्तीगत मत ठरत) त्यामुळेच मराठी संस्कृती इंग्रजांसारख्या आक्रमकाच्या कुतूहलाचा विषय ठरली.'( टाळ्या :) हलकेच घ्या, इथे सांस्कृतीक अथवा राष्ट्रवादाची भलावण, स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणारी व्यक्तीगत मते विकिपीडिया सारख्या ज्ञानकोशातून टाळावयास हवीत). अनेक जिज्ञासू इंग्रजांनी तिचा अभ्यास केला (अनेक? जिज्ञासू हे विशेषण आहे ते टाळा ) . ही महाराष्ट्राची न्यायासाठी लढण्याची परंपरा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत अविरत चालू होती असे दिसते.(सापेक्ष व्यक्तीगत मत ) म्हणूनच, मराठी भाषेचा आहाला विसर पडला तर आमचा इतिहास आणि परिणामत: मराठी संस्कृतीचा आहाला विसर पडेल ही शंका आपण महाराष्ट्रीयांना अनेक शतकापासून भेडसावीत आहे. (प्रथम पुरूष: मी आम्ही द्वितीय पुरूष: तू तुम्ही हे टाळावयास हवे. व्यक्तीगत मत आहे सर्व काळी सर्व संस्स्कृतीमधे अशी मते वेळोवेळी व्यक्त होतच असतात वस्तुनिष्ठतेचा अथवा नेमके पणाचा अभाव आहे एनीवे संदर्भ हवा)
जेव्हा मोगली सत्ता महाराष्ट्रावर पसरली तेव्हा मराठीत फारसी-अरबी शब्दांचे पेव फु टले (क्रियापद व्यक्तीगत मताचा पूर्वग्रहाचा आभास देते क्रियापद बदलावे आणि संदर्भ उधृत करावा). छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधीशांची हकालपट्टी केली आणि मराठी सत्तेची स्थापना केली, त्या बरोबरच राज्यव्यवहारात प्रचलित झालेल्या फरसी-अरबी शब्दांच्या जागी योग्य मराठी प्रतिशब्द परत आणले (खरे आहे पण संदर्भ हवा) व मराठी भाषेवरील परकी शब्दांचा पगडा हटविला (वस्तुनिष्ठतेच्या दृष्टीने वाक्यास पुर्नरचनेची आणि संदर्भाची आवश्यकता). . पुढे[ कालसापेक्षता टाळा]
इंग्रजी सत्ता भारतात सुरू झाल्यावर इंग्रजी भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणे याला काही लोक सुशिक्षिततेचे, सुसंस्कृतपणाचे लक्षण मानू लागले. सरकारी नोकरी मिळविण्याचे ते साधन झाले. तरी सुद्धा, इंग्रजी भाषा परकीय राज्यर्कत्यांची असल्याने आपल्या पराभवाचे आणि पारतंत्र्याचे चिन्ह आहे असे मानणारे अनेक लोक होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी साहित्य आणि वृत्तपत्रे यामध्ये कटाक्षाने इंग्रजी शब्द टाळून, इंग्रजी किंवा पाश्चात्य संकल्पनांना मराठी भाषेत वापरण्याचा प्रघात पडला.(खरे आहे पण संदर्भ हवा) तशी मराठी प्रमाण मानली जाऊ लागली. त्या वेळच्या मराठी कथा कादंबऱ्यातून, मराठीत बोलताना विनाकारण इंग्रजी शब्दांचा वापर करणाऱ्यांची टिंगल केलेलीही आढळते.[ संदर्भ हवा ] शुद्ध मराठीच्या वापराचा आग्रह स्वातंत्र्य मिळाल्यावरही चालूच राहिला आणि नावाजलेली मराठी वृत्तपत्रे भेसळीपासून दूर राहिली अशा प्रयत्नांमुळेच मराठी भाषा पारतंत्र्यांचा व स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास आपल्यामध्ये सामावून घेऊन आणि आपले मराठीपण टिकवून विस्तारली. (स्वातंत्र्यानंतरच्या मराठीच्या विस्ताराबद्दलचे मराठी भाषा अभ्यासकांची मते संदर्भासहीत उधृत करावीत)
पण मग बदलांशी जुळते घ्यावे हे मत चुकीचे आहे का? नक्कीच नाही.(वरील विवेचनावरून येथे का काट मारली ते समजले असे हे वाक्य टाळावे) आपल्या भाषेवर परकी भाषांचा चांगला परिणामही झाला आणि तो टिकलाही.( चांगला म्हणजे चांगला या अर्थाने का मोठा या अर्थाने ? चांगला हे एकतर विशेषण म्हणूनटाळावयास हवे शिवाय त्या विशेषणामुळे येथे मतातत व्य्क्तीगतपणा येतो आहे) इंग्रजीतून आपल्याकडे आलेल्या संकल्पना मांडण्यासाठी, तसेच इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय हणून नवे शब्द निर्माण करावे लागले आणि मराठी शब्दसंपदा वाढली. नवीन विराम चिन्हे वापरात आली आणि त्यामुळे वाक्यरचना अधिक अर्थवाही झाली. वाक्यरचनेत काही क्लिष्टता आली, पण नवा डौलही आला.(बरोबर आहे पण मराठी भाषा अभ्यासकांचा संदर्भ हवा)
ज्या इंग्रजीच्या आक्रमणाची आपण भीती बाळगतो त्या भाषेचा इतिहास पाहिला तर असे दिसते की पुरातन इंग्रजी भाषा पाचव्या शतकापासून ज्या आंग्लेस, सॅक्सन आणि ज्यूट अशा जर्मनिक टोळ्यांनी इंग्लंडमध्ये वसती केली, त्यांच्या बोली भाषांच्या मिश्रणाने निर्माण झाली. ती भाषा आजच्या इंग्रजीत काहीच सार्धम्य आढळत नाही, ती आजच्या सामान्य इंग्रजाला समजणारही नाही. सुमारे चवदाव्या शतकात त्या भाषेत आज ओळखता येण्याजोगा इंग्रजीपणा आला. तरीसुद्धा स्पेलिंग आणि व्याकरणाच्या बाबतीत ती इंग्रजी आधुनिक इंग्रजीहून भिन्न होती. त्या पुढील काळातही इंग्रजी भाषा सारखी बदलत असल्याने फ्र ान्सिस बेकनसारखे इंग्रज विचारवंत आपले ग्रंथलेखन विद्वानांनी मान्य केलेल्या आणि स्थैर्य आलेल्या लॅटिन भाषेत करीत. मात्र, चॉसरसारख्यांनी इंग्रजी तग धरेल, या आशेवर लिखाणासाठी इंग्रजी स्वीकारली. पुढे इंग्लंडमध्ये राष्ट्रभावनेचा उदय झाला. सर्वांना वाचून समजेल, असे बायबल इंग्रजीत १६११ मध्ये तयार करण्यात आले आणि उत्तमोत्तम साहित्याची सातत्याने निमिर्ती होत राहिली. त्यामुळे भाषेला स्थैर्य आले आणि प्रमाण इंग्रजी हणजे स्टॅण्डर्ड इंग्लिश अस्तित्वात आली. (हा परिच्छेद इंग्रजी भाषा लेखात इतिहास विभाग बनवून संदर्भा सहीत दिल्यास मराठी विकिप्डियावर स्विकार्ह आहे पण तोच तुम्ही मराठी भाषा संदर्भाने देता तेव्हा तुमचा उद्देश वाचकाच मत प्रभावित करण्याचा असतो आणि विकिपीडिया ज्ञानकोश असल्यामुळे कोशकर्त्यांनी वाचकाच मत हे प्रभावित होईल अशा प्रकारचे लेखन टाळले पाहीजे.)
आपण जर मराठी आणि इंग्रजी भाषांच्या घडणीची तुलना केली तर असे दिसून येते की मराठी भाषेत इंग्रजीत झाले तसे मोठ्या प्रमाणात बदल झाले नाहीत कारण आपण मराठी लोकांनी आपली भाषा जिवापाड जपली.(सापेक्ष व्यक्तीगत मत रेटणे वस्तुनिष्ठतेचा अभाव, इंग्रजांनी त्यांची भाषा जिवापाड जपली याचे संदर्भ उपलब्ध होऊ शकतात तसेच मराठी लोकांनी तेवढीती जिवापाड जपली नाही याचेही संदर्भ उप्लब्ध केले जाऊ शकतात). त्याचप्रमाणे तीत सातत्य राखले.(सापेक्ष व्यक्तीगत मत रेटणे वस्तुनिष्ठतेचा अभाव) मराठीतील जुने संत आणि ललित साहित्य, ऐतिहासिक पत्रव्यवहार हे सर्व आजची मराठी बोलणारा माणूस थोड्या प्रयत्नाने वाचून, ऐकून समजू शकतो. जुन्या इंग्रजीच्या बाबतीत हे शक्य नाही.(सापेक्ष व्यक्तीगत मत रेटणे वस्तुनिष्ठतेचा अभाव) वेळोवेळी मराठीवर झालेली आक्रमणे परतवून लावण्यात उत्तम साहित्यनिमिर्ती,(इथ पर्यंत ठिक) सामान्य मराठी भाषिकाचे मराठीवरील प्रेम (व्यक्तिगत मत, सांस्कृतिक राष्ट्रवादाची भलावण) आणि राजाश्रय यांचा मोठा उपयोग झाला(संदर्भ देऊन राजाश्रयाचा उपयोग झला हे ठीक पण मोठा हे विशेषण व्यकिगतमत आणि सापेक्षता आणते आणि वाक्य वस्तुनिष्ठतेपासून दूर नेते) . प्रत्येक परीक्षेतून मराठी भाषा अधिकच सुदृढ, सुघड होऊन बाहेर आली. मागील पिढ्यांनी प्रतिकूल परिस्थिीतीतही मोठ्या प्रयत्नाने मराठी नुसती टिकविलीच नाही, तर तिचा उत्तम विकास केला, तसेच प्रयत्न आधुनिक काळात सामान्य मराठी भाषिकांनी, साहित्यिकांनी, पत्रकारांनी आणि राज्यर्कत्यांनी केले, तर निश्चितच मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल ठरेल. (विकिपीडिया हि पुअदेश किंवा जाहीरात करण्याची जागा नव्हे त्यामुळे अविश्वकोशिय आणि म्हणून मराठी विकिपीडियास अस्विकार्ह)
संदर्भ - १. सह्यादी - लेखक श्री. स. आ. जोगळेकर
२. मराठी भाषेचा इतिहास - लेखक श्री. ग. नी. जोगळेकर (येथे डॉ. गं. ना. जोगळेकर असे नाव हवे.- संतोष शेणई.)
सागर:मराठी सेवक ०६:१४, १२ ऑगस्ट २०११ (UTC)
मराठी भाषेच्या शोधात..
[संपादन]अमेरिकानिवासी मराठी माणसांनी मराठीसाठी वाखाणण्यासारखे प्रयत्न केलेले आहेत यात शंका नाही. पंचवीसतीस वर्षांपूर्वी आलेले मराठीजन साधारणपणे मध्यमवर्गीयच. सहाजिकच या पिढीला अमेरिकेत पाऊल ठेवल्यापासूनच 'माझ्या मराठीची वाट' मागे हरवू पहाते आहे असं वाटू लागलं. 'जन्मभूमीशी असलेली अदृश्य पण चिवट नाळ कापणं अशक्य आहे हे देशांतर केल्यावरच उमगणारे चिरंतन सत्य आमच्या पिढीला जसं समजत गेलं तसं तसे मराठीपणाच्या शोधात अनेक उपक्रम होत गेले. त्यात मराठी मंडळे, बृहन्महाराष्ट्र मंडळे, अधिवेशने, मराठी नाटके, मराठी गीतांच्या रेकॉर्ड, कॅसेट, सी. डी. इ.) असे काही...
आमच्या मुलांच्या 'एबीसीडी' पिढीपर्यंत आमची मराठी पोहोचवण्यासाठीची धडपड म्हणून मुलांसाठी जागोजागी 'बालविहार' सुरू झाले. त्यांना मराठी शिकवण्यासाठी पुस्तके लिहिली गेली. मराठी गाणी गोष्टींच्या आणि मराठी शिकवण्याची तंत्रे असलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क काढल्या गेल्या. अमेरिकेतील मराठी समाजात आपल्या अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी काही संवाद असण्याची आणि त्यासाठी काही व्यासपीठ असण्याची आवश्यकता वाटू लागली. कारण अनुभवांची देवाणघेवाण आपल्या सांस्कृतिक संदर्भात होण्यासाठी मातृभाषेशिवाय पर्याय नसतो.
या अपरिहार्यतेतूनच १९७८ मध्ये कॅनडातील श्री. विनायक गोखले व श्री. अशोक पांगारकर यांच्या प्रयत्नांतून 'एकता' हे त्रैमासिक सुरू झाले. कम्प्युटर नसल्यामुळे तो मजकूर हस्तलिखित करावा लागे. कॅनडातून प्रसिद्ध झालेल्या या त्रैमासिकाच्या उपक्रमाने मराठी लोकांना अनुभवांच्या अभिव्यक्तीची दारं खुली केली. १९८१च्या सुमारास 'बृहन्महाराष्ट्र वृत्त' हे मासिक वृत्तपत्र सुरू झाले. त्याच सुमारास वॉशिंग्टन डी. सी. येथील श्री. दिलीप चित्रे आणि मौजेचे (कै.) श्री. पु. भागवत यांच्या संयुक्त प्रयत्नातून 'कुंपणापलीकडले शेत' हा भारताबाहेरील मराठी लोकांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. महाराष्ट्रातील मराठी साहित्यात उमटलेला अमेरिकन मराठी जीवनाचा हा पहिला पडसाद.
भारतातून येणार्या नव्या पिढ्यांतल्या इंग्रजी माध्यमाच्या लोकांना मराठीचं आणि म्हणून मंडळांचं प्रेम फारसं नसल्यामुळे मराठीच्या पिढीनंतर मराठी मंडळं तरी टिकणार का हा प्रश्न निर्माण झाला. त्याच वेळी 'एच वन' पिढी. 'वाय टू के' पिढी असे काही प्रवाह मराठी समाजाला येऊन मिळाले. यातल्या काहींनी मराठी मंडळात रस घेतला. सर्वच पिढ्या आपापल्या परीने आणि महाराष्ट्राच्या मराठीपणाशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधल्या गेलेल्या. कम्प्युटर आला आणि त्या लाटेवर स्वार होऊन वर मराठी असे आमची मायबोली बागडू लागली.
कम्प्युटरवर मराठी मंडळांची आणि साहित्यात रस घेणाऱ्यांची संकेतस्थळे, मराठीतली कम्प्युटरवरची नियतकालिके यांचे मळे वाहू लागले. 'विंडोज' निर्माण होण्याच्याही पूवीर् कम्प्युटरवर मराठी फॉन्ट निर्माण केले ते मिशिगनचे डॉ. माधव देशपांडे आणि कॅनडातले डॉ. अशोक अकलूजकर यांनी!
त्यानंतर सॅन होजे, कॅलिफोनिर्या येथील श्ाीकृष्ण पाटील यांनी मराठीचे नव्हे तर सर्वच भारतीय लिपीसाठी आणि हिब्रू लिपीसाठीही फाँट निर्माण करून नवी पाऊलवाटच निर्माण केली. आज महाराष्ट्रात विपुलपणे उपलब्ध असलेल्या देवनागरी फाँटची गंगोत्री अमेरिकेतल्या मराठी समाजात आहे!
विविध माध्यमांतून ललित लेखन आणि पत्रकारितेचे लेखन या दोन्ही अंगांनी मराठीचा वेल गेल्या पंचवीस वर्षांत वेगवेगळ्या दिशांनी डवरला आहे. महाराष्ट्रातील मराठी साहित्यात आणि अमेरिकेतील इंग्रजी व मराठी अशा दोन्ही साहित्यात याची रसरशीत पालवी दिसते! साहित्य आणि साहित्यिक या दोघांचीही समृद्धता जाणवते. मराठी अधिवेशनानिमित्त प्रसिद्ध होणारे अंक, विविध मराठी मंडळांचे दिवाळी अंक, महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या इंटरनेटवरील आवृत्त्या, अशी आणखी माध्यमेही येथील मराठी माणसांच्या अभिव्यक्तीसाठी उपलब्ध आहेत.
२००७ मध्ये एकताबरोबरच सावली (मराठी मित्र मंडळ, टेक्सास), रंगदीप (न्यूजर्सी), अभिरुची (टॅम्पाबे, फ्लॉरिडा), असे काही दिवाळी अंक आणि 'मायबोली' अंतराळ हे ई-दिवाळी अंक महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकांच्या पंक्तीत बसणारे अंक प्रसिद्ध झाले.
मराठी भाषा, संस्कृती याबद्दल अमेरिकन विद्यापीठात अमराठी, अमेरिकन संशोधकही आपली भर घालत आहेत. काही विद्यापीठातील ग्रंथालयातून मराठी विभाग आणि मराठी ग्रंथसंपदा आहे. त्यामुळे मराठीपणाच्या शोधात आमच्या मराठीचा वेलू देशांतरी गेला आहे!
थोडक्यात मक्याचा म मराठीचा झाला आणि आता तो म कार महामंडल असा महाजालाचा म झाला.
हे सारे आमचे मराठी भाषेतले आणि मराठी भाषेसाठी केलेले प्रयत्न. मराठी भाषेचा आणि आमच्या मराठीपणाचा हा एक शोध आहे. अर्थात अजून पुष्कळ वाटचाल करायची आहे. या मराठी साहित्याला अमेरिकेतल्या मराठी समाजात , अधिवेशनात म्हणावी तशी सन्मान्यता अजून मिळालेली नाही. एखादा अपवाद वगळता मराठी साहित्याबद्दल काही चर्चासत्र मराठी अधिवेशनात झालेले नाही. मराठी साहित्य संमेलन तर अजून कल्पनेतच आहे.
महाराष्ट्रातील मराठी साहित्य संमेलनांत ग्रामीण, दलित साहित्य असते. तसे 'अनिवासी' साहित्य अजून गणना करण्याएवढेही नाही. कोणी त्या साहित्य संमेलनांत साहित्य सादर केल्याचे एकिवात नाही. अमेरिकेत 'बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरिज'सारख्या उपक्रमांतून या साहित्याची गणना होण्याचे स्वप्न अजून खूप दूर आहे. दोन्ही देशांत हे साहित्य 'अनिवासी'च आहे.
एवढेच नव्हे, तर अमेरिकेतल्या पहिल्या पिढीनंतर हे साहित्य अस्तंगत होण्याची दाट शक्यता आहे.
तरी मराठी साहित्यात उमटलेल्या अमेरिकन मराठी मनांच्या स्पंदनांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे यात शंकाच नाही!
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |