विकिपीडिया:तमिळनाडू दालन/विशेष लेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मदुरै/किंवा स्थानिक भाषेत अनेकदा कूडल(कूडलनगर)ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. [तमिळःமதுரை इतर उच्चार : मदुराय] भारताच्या तामीळनाडू राज्यातील एक शहर आहे,तसेच मदुरै हे नगर भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले नगर म्हणुन देखील ओळखले जाते. मदुरै हे अत्यंत ऐतीहासिक आणि प्राचीन नगर असून ते वैगै ह्या नदीच्या काठी वसले आहे.मदुरै ला देउळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते,तसेच ते तमिळनाड राज्याची सांस्कृतीक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणुनही प्रसिद्ध आहे तसेच मल्लीगै मानगर(मोगरा(फुल) महानगर),तूंग महानगर (जागृत मानगर ),पुर्वेकडील अथेन्स (Athens of the East)अशा नावांनी मदुरैची ओळख आहे. हे महानगर मदुरै जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असून तमिळनाडुतील ते तीसरे मोठे महानगर आहे.मदुरै शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे.मदुरै महानगरात प्रामुख्याने तमिळ भाषा बोलली जाते तसेच येथील तमिळ भाषेला विशेष महत्व आहे.मदुरै ची तमिळ हि कोन्ग तमिळ,नेल्लै तमिळ,रामनाड तमिळ आणि चेन्नै तमिळ ह्या बोलींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपुर्ण आहे.इथल्या तमिळ बोलीला सर्वसाधारणपणे संपुर्ण राज्यात उत्कृष्ट असे प्रमाण मानण्यात आले आहे.तमिळ सोबतच इंग्रजी,तेलुगू,सौराष्ट्रउर्दु काही प्रमाणात बोलल्या जातात.परंतु इतर सर्वच भाषांमध्ये तमिळ शब्दांचा प्रभाव दिसुन येतो.

मीनाट्चीअम्मन कोविल/कोईल (मिनाक्षी आईचे देऊळ)
मीनाट्चीअम्मन कोविल/कोईल (मिनाक्षी आईचे देऊळ)
  • मीनाट्चीअम्मन कोविल/कोईल (मिनाक्षी आईचे देऊळ) भगवान शंकर(सुंदरेश्वर) व पार्वती (मिनाक्षी) देवीचे हे एक सुरेख असे धार्मिक स्थळ असून ते मिनाक्षी देवीच्या नावाने ओळखले जाते. मदुरै नगराची रचना हि प्रामुख्याने मिनाक्षी देवीच्या देवळाच्या आजुबाजूस विस्तारीत आहे,पुर्वी संपुर्ण नगराच्या मध्यस्थानी मिनाक्षी सुंदरेश्वराचे देऊळ दिसत असे.मिनाक्षी सुंदरेश्वराचे हे गोपुरम (एकुण १४ गोपुर) शैलीतील असे स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेले देऊळ आहे.हे देशातील प्रमुख शक्तीपिठांपैकी एक आहे. हे १६व्या शतकातील बांधकाम असून त्याचे क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मीटर इतके आहे.हजार खांबाचा मंडप हे इथल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.

मदुरैनगराच्या केंद्रस्थानी असणारे हे भगवान विष्णुंचे एक अतिशय सुंदर देऊळ आहे.इथे विष्णु "अळगर"(अर्थ:सुंदर असा) ह्या नावाने ओळखले जातात.हे विष्णुच्या १०८ दिव्यदेशम अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे.हे देऊळ देखील अतिशय प्राचीन असून हजारो भक्तगणांची इथे नेहमीच रेलचेल असते.