वावी (सिन्नर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?वावी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सिन्नर
जिल्हा नाशिक जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

वावी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

  नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्वेस असलेले वावी हे गाव सिन्नर-शिर्डी ह्या मार्गावरील सिन्नर तालुक्यातील प्रमुख व्यापारी, आर्थिक व शैक्षणिक केंद्रापैकी एक केंद्र आहे.
  सिन्नरच्या पूर्वे व उत्तरेला  अहमदनगर जिल्ह्याची कोपरगाव तालुक्याची व दक्षिणेला संगमनेर तालुक्याची सीमा आहे.

हवामान[संपादन]

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.

लोकजीवन[संपादन]

   वावी गाव हे सह्याद्रीच्या पर्जन्यछायेतील गाव असल्याने पावसाचे प्रमाण नेहमीच कमी असते.गावातील व परिसरातील वाड्यांतील लोकांचा मुख्य व्यवसाय पावसाच्या पाण्यावरील शेती हाच आहे. गावातील शेतीला निश्चित असे पाणी पुरवणारी पाणी योजना नाही, ती होणे गरजेचे आहे.  
    पूर्वी गावातील शेतकरी बाजरी, ज्वारी, भुईमूग ही मुख्य पिके तर  अंतर्पिके म्हणून मठ, मूग, उडीद, चवळी, तूर इ. पिके घेत. पाण्याच्या उपलब्धतेवर गहू, हरभरा ही पिके घेतली जात.आता अलीकडे शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी सोयाबीन, मका, कापूस ही पिके घेऊ लागली आहे.
    पावसाच्या लहरीपणावर शेती अवलंबून शेती असल्याने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न नसल्याने शेतकरी उपजीविकेसाठी शेतकरी दुग्धव्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय करतात.40 वर्षांपूर्वी एकच दुग्ध संकलन संस्था असलेल्या गावात 6/7 दुग्ध संकलन संस्था स्थापन झाल्या आहेत.
   गावात मराठा व माळी समाज बहुसंख्येने असला तरी मागास व अल्पसंख्यांक समाज गावात एकोप्याने राहतात.
   गावात ह भ प पांडुरंग महाराज वावीकर यांच्या प्रेरणेने  कै. रामगिरी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त  हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. तसेच शिवजयंती, गणपती उत्सव, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, तुकाराम बीज, संत शिरोमणी सावता महाराज जयंती, ईद, मोहरम इ. उत्सव सर्वधर्मिय समाज एकत्रितपणे साजरे करतात.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

 वावीमध्ये वैजेश्वर,श्रीराम,मारुती, भैरवनाथ, विठ्ठल, संत तुकाराम, संत सावता, शाहीर परशुराम समाधी, लक्ष्मणगिरी महाराज समाधी, रामगिरी महाराज समाधी आहेत. 
 वैजेश्वर मंदिर यादव काळाचा इतिहास सांगते.
   यात्रा, बोहडयांची गावात परंपरा होती.

नागरी सुविधा[संपादन]

वावी गावात पोस्ट खाते, पोलीस स्टेशन ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी,सरकारी बँक व सहकारी पतसंस्था, सहकारी दूध संकलन संस्था,सार्वजनिक पाणी नळयोजना, महिला बचत गट आहेत.

    गावात सप्तहातून एकदा आठवडे बाजार ( जनावरे, धान्य, भाजीपाला ) दर मंगळवारी भरतो.

जवळपासची गावे[संपादन]

      वावी हे सिन्नर तालुक्याच्या पूर्व सीमेवरील प्रमुख व्यापारी, शैक्षणिक केंद्र आहे. गावाला अनेक छोट्या छोट्या वाडी, वस्त्यांची पंचक्रोशी लाभलेली आहे.गावाच्या चारी दिशांना असणाऱ्या माळवाडी, वल्हेवाडी, घोटेवाडी, कहांडळवाडी, दुसिंगवाडी, मलढोण, मिरगाव, पिंपरवाडी, पांगरी, मिठसागरे, शहा, पाथरे, निऱ्हाळे, मऱ्हळ अशा गावांचा वावी गावाशी दैनंदिन संपर्क आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate