वर्ग चर्चा:सामाजिक कार्यकर्त्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी विकीवर सामाजिक कार्यकर्ते असा वर्ग आहे. तो बहुतांशी पुरुष सदस्यांना लागू  पडतो. एकूणातच भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या प्रमाणावर महिला सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना आणि आपले योगदान देत असताना लिंगसमभाव तत्वांचा विचार करता अशा महिलांच्या लेखांसाठी स्त्रीवाचक स्वतंत्र वर्ग आवश्यक वाटतो आहे. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) ११:१०, १६ जुलै २०१८ (IST)

समर्थन. --वि. नरसीकर , (चर्चा) ११:१६, १६ जुलै २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgअभय नातू, Tiven2240, सुबोध कुलकर्णी, ज्ञानदा गद्रे-फडके, Sureshkhole: नमस्कार

समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या यापैकी नेमका कोणता वर्ग वापरून चालेल असा प्रश्न आहे. समाजसेविका शब्दात पूर्णवेळ सामाजिक काम उदा. सिंधूताई सपकाळ तर सामाजिक कार्यकर्त्या यात अन्य कामे सांभाळून सामाजिक काम अशा छटा जाणवतात. उदा. सुद्धा मूर्ती. सर्वानी आपापले मत नोंदवावे. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) ११:२८, १६ जुलै २०१८ (IST)

सामाजिक कामासाठी निस्वार्थीपणे जीवन वाहिलेल्या व साधारणपणे कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसलेल्या त्या समाजसेविका/समाजसेवक तर एखाद्या पक्षास बांधील राहून काम करणाऱ्या त्या सामाजिक कार्यकर्त्या/कार्यकर्ते असे साधारणपणे समजतात.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:४४, १६ जुलै २०१८ (IST)
तटस्थपणे विचार केला तर समाजासाठी काम हा एक व्यवसाय होय. त्यात पैसे किती मिळतात, वेळ किती जातो हा मुद्दा गौण आहे असे मला वाटते. शिवाय ते स्वेच्छेने स्वीकारलेले काम आहे. त्यात सेवा कोणाची/कशी? माझ्या मते सामाजिक कार्यकर्ते या वर्गात स्त्री,पुरुष व इतर लिंगी सर्व येतात. अथवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असा वर्ग करावा.

मुळात ज्ञानकोशात लिंग/जात यावर आधारित वर्ग असूच नयेत असे वाटते.प्रत्येक व्यवसायाच्या बाबतीत असे लिंगावर/जातीवर आधारित वर्ग करण्याची आवश्यकता नाही. उदा.दलित लेखक,मराठा लेखक,जैन लेखिका,ब्राह्मण गायक,मारवाडी अभिनेता इ. वर्ग आपण करत रहाणार आहोत का हा खरा धोरण संबंधीत प्रश्न आहे. यावर चर्चा व्हायला हवी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:५२, १६ जुलै २०१८ (IST)

माझे मत[संपादन]

  • ह्यातील अनेक वर्ग हे त्या व्यक्तीं स्वत:ला काय म्हणतात त्यानूसार ठरवावे असे मला वाटते. आणि असे म्हणणाऱ्यांची संख्या लक्षणीय असेल तर वर्ग करायला हरकत नाही. जसेकी, स्त्रीवादी, मार्क्सवादी, दलित वगैरे वगैरे, मग त्यात जात लिंगभाव सगळं आलच अगदी लैंगिकता सुध्दा, अर्थात अजुन असे लेख मराठीवर यायचेत ज्यात, ह्या वर्गांची आवश्यकता पडेल.
  • उदाहरणादाखल, एल.जी.बी.टी.हक्कांसाठी काम करणारे भारतीय कार्यकर्ते, असा वर्गही इंग्रजीवर आहे. आणि त्याला कारण लेखांची संख्या आहे.
  • सध्या जर फ़क्त सा.का. ह्या वर्गात बाया-बापे आणि बाया-बापे एवढीच माहिती देणारे लेख असतील तर तेव्हढ्यावरच भागेल. जसे-जसे लेख विकसित होतील संख्या वाढेल तसे त्यांना पुढे वर्गिकरण करावे लागेल.
  • इथे सध्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत हा सर्वांसाठीचा आणि सा.का. बायांची संख्या लक्षणीय असल्यास त्यांचा वेगळा वर्ग करायला हरकत नाही. WikiSuresh (चर्चा) १३:०५, १६ जुलै २०१८ (IST)

समाजसेविका / सामाजिक कार्यकर्त्या या शब्दांच्या अर्थात फरक असला तरी असे दोन वेगवेगळे वर्ग करू नयेत, असे वाटते. कारण भविष्यात लेखांना वर्ग लावताना, अभिप्रेत वर्ग लावला जाईलच असे नाही.त्यामुळे दोन वर्गात असे लेख विभागले जातील आणि त्यात सुसूत्रता राहणार नाही.'सामाजिक क्षेत्रात कार्यरत' असा सर्वसमावेशक वर्ग करण्याची सूचना चांगली आहे. तसेच जातीच्या आधारांवर वर्ग तयार करू नयेत, असे माझे मत आहे. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १३:४५, १६ जुलै २०१८ (IST)