वर्ग चर्चा:देवळी तालुक्यातील गावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू, संदेश हिवाळे: या वर्गास व यासम सर्व वर्गास, वर्ग:महाराष्ट्रातील गावे या वर्गात टाकल्यास महाराष्ट्रातील सर्व गावांची अनायासे यादी तयार होईल काय?--वि. नरसीकर , (चर्चा) २०:३६, १८ जानेवारी २०१८ (IST)

होईल पण सगळ्या गावांबद्दलच्या लेखांची यादी तेथे दिसणार नाही. वर्गांची यादी दिसेल. त्यात गेले असता त्या त्या तालुका, जिल्ह्यातील गावे दिसतील.
महाराष्ट्राच्या सर्व गावांची यादी करण्यासाठी AWB किंवा तत्सम सांगकाम्याद्वारे अशा सगळ्या वर्गांतील लेखांना महाराष्ट्रातील गावे असा वर्ग (लेखात नसल्यास) घालावा. त्याने अशी यादी तयार होईल.
अभय नातू (चर्चा) २१:०८, १८ जानेवारी २०१८ (IST)
तुमचा प्रश्न मला कळला नाही. महाराष्ट्रातील गावावरील लेखाला 'वर्ग:महाराष्ट्रातील गावे' न वापरता त्या त्या तालुक्यातील गावे व त्याच्या जिल्हाातील गावे हे संदर्भ वापरायला हवे.. कारण महाराष्ट्रात ४०,०००+ गावे आहेत.. भविष्यात यावरील लेखात वाढ होईल व १% जरी लेख बनले तर ते ४०००+ असतील, म्हणून ते तालुकानिहायच योग्य होईल..

--संदेश हिवाळेचर्चा २३:१०, १८ जानेवारी २०१८ (IST)

असे असेल तर मग महाराष्ट्रातील गावे यातील इतर लेखांतील वर्ग काढावयास हवा. या वर्गात फक्त उपवर्गच हवेत.असळज, आलेश्वर औदुंबर आदी ४१ गावात लावण्यात आलेला वर्ग:महाराष्ट्रातील गावे हा वर्ग काढावा.आशा आहे हे काम आपण कराल.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:३५, १९ जानेवारी २०१८ (IST)