लॉर्ड विलिंग्डन
फ्रीमन फ्रीमन-थॉमस, विलिंग्डनचा पहिला मार्क्वेस, जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., जी.सी.आय.ई., जी.बी.ई., पी.सी. (सप्टेंबर १२, इ.स. १८६६ - ऑगस्ट १२, इ.स. १९४१) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता.
फ्रीमन थॉमस हे जन्मनाव असलेला विलिंग्डन इटन कॉलेज व ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकला. १८९२मध्ये त्याने आपले आडनाव फ्रीमन-थॉमस असे बदलून घेतले. १९०० ते १९१० दरम्यान ही हेस्टिंग्स व बॉडमिन मतदारसंघांतून ब्रिटिश संसदसदस्य म्हणून निवडला गेला.
फ्रीमन-थॉमसला १९१०मध्ये बॅरोन विलिंग्डन व १९२४मध्ये व्हायकाउंट विलिंग्डन ही पदवी दिली गेली. १९३१मध्ये त्याला अर्ल ऑफ विलिंग्डन व व्हायकाउंट रॅटेनडन या पदव्या तर १९३६मध्ये मार्क्वेस ऑफ विलिंग्डन ही पदवी बहाल केली गेली.
विलिंग्डनने १९२७मध्ये रॉयल केनेडियन गॉल्फ असोसियेशनला विलिंग्डन चषक बहाल केला. या चषकासाठीची स्पर्धा कॅनडामध्ये आजतगायत सुरू आहे.
विलिंग्डनला १९३१मध्ये भारतात व्हाइसरॉय म्हणून पाठविण्यात आले. येथे असता त्याने आपल्या काही भारतीय वंशाच्या मित्रांसमवेत बॉम्बे यॉट क्लबमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला भारतीय बरोबर असल्यामुळे प्रवेश नाकारला गेला. म्हणून त्याने विलिंग्डन क्लब ही संस्था स्थापन केली व त्यात ब्रिटिश व भारतीय लोकांना मुक्त प्रवेश देण्याचे हुकुम दिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: लॉर्ड आयर्विन |
भारतातील इंग्लंडचे व्हाइसरॉय एप्रिल १८, इ.स. १९३१ – एप्रिल १८, इ.स. १९३६ |
पुढील: लॉर्ड लिनलिथगो |