Jump to content

लुइस स्लोतिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुइस स्लोतिन
जन्म १ डिसेंबर, १९१० (1910-12-01)
विन्नीपेग, मनिटोबा, कॅनडा
मृत्यू ३० मे, १९४६ (वय ३५)
लॉस अलामोस, न्यू मेक्सिको
मृत्यूचे कारण किरणोत्सर्ग बाधा
पेशा भौतिकशास्त्रज्ञरसायनतज्ञ


लुइस अलेक्झांडर स्लोतिन (१ डिसेंबर १९१० - ३० मे १९४६) हा कॅनडियन भौतिकशास्त्रज्ञरसायनशास्त्रज्ञ होता. त्याने दुसऱ्या महायद्धादरम्यान अण्वस्त्र बनविण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेल्या गोपनीय मॅनहॅटन प्रकल्पात सहभाग घेतला होता. अण्वस्त्रामधील विखंडन (fission) रासायनिक क्रिया अखंडित (sustained nuclear reaction) चालू राहण्यासाठी कमीत कमी किती प्लुटोनियमयुरेनियम आवश्यक आहे यावर तो संधोधन करत होता.(त्याला क्रिटिकल मास (critical mass)) म्हणतात.) दुसऱ्या महायुद्ध चालू असतांनासुद्धा त्याचे हे संशोधन लॉस अलामोस राष्ट्रीय प्रयोगशाळेत चालू होते.

२१ मे १९४६ रोजी स्लोतिनने चुकून विखंडन क्रिया चालू केली व त्यातून एकदम भेदक किरणोत्सार बाहेर पडला. त्याला तडक रुग्णालयात नेण्यात आले मात्र तरीही नऊ दिवसांनंतर ३० मे रोजी किरणोत्सर्गामुळे त्याचे निधन झाले. तो अशा प्रकारच्या अपघाताला बळी ठरणारा दुसरा व्यक्ती आहे.[]मात्र स्लोतिनच्या प्रासंगावधानामुळे प्रयोगशाळेतील त्याच्या इतर सहकाऱ्यांचे प्राण वाचले. यासाठी अमेरिकेच्या सरकारने त्याचा मरणोत्तर वीर म्हणून गौरव केला. हा अपघात व त्याचा परिणाम यांचे अनेक कल्पित वृतांतामधून नाट्यीकरण करण्यात आले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Criticality Accidents". 2014-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ सप्टेंबर २०१० रोजी पाहिले.