Jump to content

लीला सेठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Leila Seth (es); লীলা শেঠ (bn); Leila Seth (fr); Leila Seth (ast); Leila Seth (ca); लीला सेठ (mr); लीला सेठ (mai); ଲୈଲା ସେଠ୍ (or); Leila Seth (ga); 萊拉·塞特 (zh); لیلہ سیٹھ (pnb); لیلا سیٹھ (ur); Leila Seth (sv); Leila Seth (de); ليلا سيث (arz); Leila Seth (vi); ലീലാ സേത്ത് (ml); Leila Seth (nl); Leila Seth (en); लीला सेठ (hi); లీలా సేథ్ (te); ਲੀਲਾ ਸੇਠ (pa); লীলা শেঠ (as); Leila Seth (sl); Leila Seth (sq); லீலா சேத் (ta) Indian judge (en); Indiaas advocate (nl); breitheamh Indiach (ga); न्यायधीश (hi); leila seth (te); قاضي هندي (ar); ভাৰতৰ ব্যক্তি (as); وکیل و قاضی هندی (fa); भारतीय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश (mr); O nyɛla paɣa ŋun tumdi alikaali tuma (dag)
लीला सेठ 
भारतीय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑक्टोबर २०, इ.स. १९३०
लखनौ
मृत्यू तारीखमे ५, इ.स. २०१७
नोएडा
मृत्युचे कारण
  • respiratory failure
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Loreto College
  • Loreto Convent
व्यवसाय
पद
अपत्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr


लीला सेठ

लीला सेठ (Leila Seth) (जन्म : लखनौ, २० ऑक्टोबर, इ.स. १९३०; - नॉयडा, ५ मे, इ.स. २०१७) या दिल्ली उच्च न्यायालयातील पहिल्या स्त्री-न्यायाधीश होत्या. भारतातील राज्य-उच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या स्त्री-सरन्यायाधीश झाल्या.

लीला सेठ यांचा जन्म १९३० मध्ये लखनौत झाला. वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंब सावरण्याची वेळ त्यांच्यावर आली. शिक्षणानंतर त्या आसाम रेल लिंक प्रकल्पात स्टेनोग्राफर होत्या. प्रेम सेठ यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या लंडनला गेल्या. तेथे १९५८ मध्ये लंडन बारच्या परीक्षेत पहिल्या आल्या. आयएएससाठी निवड झाल्यानंतरही त्यांनी कायदा व न्यायाचे क्षेत्र निवडले होते. त्यानंतर १९७८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मान त्यांना मिळाला व त्या १९९१ मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश झाल्या.

लीला सेठ यांच्यामुळेच हिंदू वारसा हक्क कायद्यात सुधारणा होऊन मुलींना एकत्र कुटुंबाच्या संपत्तीत समान वाटा मिळाला. समलिंगींच्या हक्कांबाबत त्यांनी ‘इंडिया यू आर क्रिमिनल इफ गे’ हा टीकात्मक लेख ‘दी न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये लिहिला होता. ‘शक्तिमान’ या मालिकेचा समाजावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यांनी काही मते मांडली होती. त्यावर आधारित ‘वुइ दी चिल्ड्रेन ऑफ इंडिया’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले.

लीला सेठ यांचे ‘ऑन बॅलन्स’ नावाचे आत्मचरित्र २००३ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी व्यावसायिक जीवनात त्यांना आलेल्या लिंगभेदाच्या अनेक अनुभवांचा उल्लेख केला आहे. पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत ज्या समस्या त्यांना जाणवल्या त्यावर ‘टॉकिंग ऑफ जस्टिस – पीपल्स राइट्स इन मॉडर्न इंडिया’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. कायद्याची तत्त्वे समानतेने राबवणे हे तर त्यांचे वैशिष्ट्य होते

इ.स. १९८८ मध्येच सरन्यायाधीश आर.एस. पाठक यांनी लीला सेठ यांची सर्वोच्च न्यायालयात नेमणूक करण्याचे ठरवले होते, पण राजकीय दबावामुळे त्यांची नेमणूक तेव्हा होऊ शकली नाही.

अपत्ये

[संपादन]

लेखक आणि कवी विक्रम सेठ, कलादिग्दर्शक आराधना सेठ, शांतुम सेठ

लीला सेठ यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • On Balance (इंग्रजी आत्मचरित्र)
  • टॉकिंग ऑफ जस्टिस - पीपल्स राइट्स इन मॉडर्न इंडिया (इंग्रजी)
  • We, The Children of India (इंग्रजी)