लक्ष्मी-केशव (कोळिसरे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्री लक्ष्मी-केशव देवस्थान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, रत्‍नागिरी जिल्ह्यातील, कोळिसरे येथील एक मंदिर आहे.[१][२]

मूर्ती[संपादन]

लक्ष्मी-केशव मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीतल्या काळसर शाळीग्राम शिळेतून घडविली आहे. तिची उंची सुमारे पाच फूट आहे. विष्णूची मूर्ती चतुर्भुज असून, हातात शंख, चक्र , गदा, आणि पद्म आहेत. मूर्तीच्या भोवतीच्या प्रभावळीत दशावतार कोरले आहेत.

ही मूर्ती साधारण सन ७५० ते ९७३ या कालावधीतील असावी असा अंदाज आहे. त्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचे राज्य होते. तत्कालीन राज्यकर्त्यांनी अशा पद्धतीच्या मूर्ती घडवून घेतल्याआहेत.

इतिहास[संपादन]

मंदिरात लक्ष्मी-केशव मूर्तीची स्थापना सन १५१० मध्ये भानुप्रभू तेरेदेसाई यांच्या हस्ते झाली. भानुप्रभू हे बहामनी राज्यातील सैतवडे महालातील गावांचे महालकरी होते.

इतर मंदिरे[संपादन]

मंदिराच्या परिसरात श्री रत्नेश्वर आणि मारुती मंदिरे आहेत.

कुलदैवत[संपादन]

या देवस्थानाला खालील कुटुंबे कुलदैवत मानतात.

]]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Āmhī Ṭiḷaka. Ṭiḷaka Kulavr̥ttānta Samitī. 1999.
  2. ^ Kesarī: Divāl̇i aṅka. Kesarī Mudraṇālaya. 1993.