Jump to content

लक्ष्मीतरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्ष्मीतरू (सिमारूबा ग्लाउका ९४०७)
सिमारूबा ग्लाउका

लक्ष्मीतरू (लॅटिन नाव:Simarouba glauca) हे तेलबिया देणारे झाड आहे. त्याचा तेलाचा उपयोग खाद्यतेल म्हणून करतात. या वनस्पतीचा प्रत्येक भागात औषधी गुणधर्म आहे, या झाडाचा बिया मध्ये ६५ % तेल असते. सामान्य नावामध्ये तिला नंदनवन वृक्ष असे म्हणतात. लक्ष्मीतरूचे अनेक उपयोग आहेत.

उत्पत्तीस्थान[संपादन]

हे झाड मूळातले मध्य व दक्षिण अमेरिकेतील आहे.

रचना[संपादन]

सर्व प्रकारच्या ओसाड व वाया गेलेल्या जमिनीवर ही झाडे वाढतात. १४ ते 20 मीटर उंच व ८ ते १० मीटर रुंद वाढतात. याला पिवळ्या रंगाची फुले येतात, याची फळे करड्या रंगाची असतात.

Simarouba glauca fruits 2

लागवड[संपादन]

हि झाडे बिया व फांद्यापासून वाढवता येतात.एप्रिल व मे महिन्यात याची फळे पिकल्यावर गोळा करतात व नंतर ती आठवडाभर उन्हात वाळवतात बीची साल काढल्यावर बिया प्लास्टिकचा पिशवीत माती घालून लावतात.दोन ते तीन महिन्यांची रोपे नंतर लागवडीसाठी वापरतात याची लागवड शेताच्या तालीवर रस्त्याचा कडेने किंवा माळरानावर केली जाते. खड्डा खणून त्यात रोप लावले जाते,पहिल्या दोन उन्हाळ्यात झाडाला पाणी द्यावे लागते वेळेवर खात दिल्याने तन काढल्याने याची वाढ जोमात होते. तसेच याची लागवड पाणी धरून ठेवण्याची क्षमता व जमिनीतला ओलावा यावर अवलंबून असते.हि झाडे संपूर्ण भारतात वाढतात. लक्ष्मीतरूची लागवड आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यात केली जाते.

उपयोग[संपादन]

  • बी मध्ये ६५% तेल असते.
  • पेंडीपासून चांगले खत बनते.
  • फळाचा रस गोड असतो व तो खाता येतो.
  • झाडावर कीड पडत नाही.

औषधी गुणधर्म[संपादन]

लक्ष्मीतरूच्या झाडाची पाने व पानाचा अर्क तापावर उपचार करण्यासाठी वापरतात.पानांचा कडवटपणा नैसर्गिक प्रतिबंधात्मक क्षमता वाढविते. कर्करोग व ट्युमरच्या उपचारात लक्ष्मीतरुचा झाडाचा उपयोग केला जातो.आधुनिक कर्करोगावर उपचार करण्यासाठी ते वापरले जाऊ शकते.लक्ष्मीतरू मध्ये खूप चांगले जीवाणुरोधक,अँटी-ट्युमरस गुणधर्म असतात. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ट्यूमर आणि दुय्यम संसर्गाचा आकार कमी करण्यासाठी लक्ष्मीतरू प्रभावी ठरते. पहिल्या / दुस-या टप्प्यात कर्करोग बरा करणे हे फार प्रभावी आहे, परंतु नंतरच्या काळात ते जीवनशैलीची गुणवत्ता वाढवू शकतात. भूक आणि पचन सुधारण्यास मदत करते. तसेच जठराची सूज, अपचन, अतिसार, चिकनगुनिया यावर सुद्धा प्रभावी आहे. झाडाच्या सालीमध्ये ही खूप औषधी गुणधर्म आहेत.

फायदे[संपादन]

४०० मिलीमीटर पावसाचा पाण्यावर ही झाडे जोरदार वाढतात, जनावरे या झाडाला तोंड ही लावत नाही. याचा गळलेल्या पानामुळे जमिनीचा कस वाढतो. याचा लाकडाला वाळवी लागत नाही. या झाडावर कीड पडत नाही. हे झाड पडीक व ओसाड ठिकाणी चांगली वाढतात. याचे तेल मुख्यत बेकारी मध्ये वापरतात. वनस्पती तूप उत्पादनासाठी हे तेल उत्तम आहे.तसेच साबण, वंगण, प्रसाधने, औषधे, यातही हे तेल वापरले जाते.या फळाचा गरात ११ % साखर असते. यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण अगदी कमी असते. शीतपेये तयार करण्यासाठी या झाडाचा फळांचा वापर करतात.याचा लाकडाचा उपयोग फर्निचर बनवण्यासाठी केला जातो.वनस्पती, बियाणे, शेल, फळ लगदा, पाने, लीफ कचरा, नको असलेली शाखा, स्टेम, झाडाची साल यासारख्या वनस्पतींचे सर्व भाग अन्न, इंधन, खत, इमारती लाकूड, औषध इत्यादी उत्पादनासाठी उपयुक्त आहेत. लीफ कचरा गांडुळेसाठी चांगले खाद्य आहे आणि ते चांगले खत बनविते. पानांची आणि झाडाची पाने म्हणजे रासायनिक क्वासीन, एक रागीय पदार्थ जे अमिबियासिस, अतिसार आणि मलेरियाच्या उपचारास उपयुक्त आहे.

आयुर्मान[संपादन]

लक्ष्मीतरूची रोपे मजबूत असतात, व ती कुठल्याही थोड्याशा खोलसर जमिनीत वाढतात. याचे आयुष्य ७० वर्षापर्यंत असते.

पर्यावरणीय परिणाम[संपादन]

जमिनीचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते याची लांब मुळे जमिनीची धूप थांबवतात भूजल स्थिती सुधारते. मातीतील सूक्ष्मजीव जीवन सुधारण्यास मदत होते. निर्जंतुकी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर लावणीमुळे पडीक जमीन सुधारली जाते.

संदर्भ[संपादन]

http://itsorganic.in/organic/paradise-tree-miracle-tree-lakshmi-taru/ Archived 2018-04-10 at the Wayback Machine.

http://www.revalgo.com/blog/lakshmi-taru-simarouba-glauca-cancer-cure/ Archived 2018-04-27 at the Wayback Machine.

https://www.artofliving.org/in-hi/laxmi-taru

http://www.svlele.com/laxmitaru.htm Archived 2017-06-27 at the Wayback Machine.

https://herbpathy.com/Uses-and-Benefits-of-Simarouba-Cid1183