रोहिलागड
किल्ले रोहिलागड
रोहिलागड ता.अंबड जि. जालना जालना जिल्हातील एकमेव आणि दुर्लक्षित गड रोहिलागड
उंची: 750 मीटर
प्रकार: गिरीदुर्ग
औरंगबादपासून 40 किमी जालनापासून 44 किमी
•रोहिलागड हे ऐतिहासिक आणि मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे.
•रोहिलागड हे डोंगरपायथ्याशी वसलेले खूप मोठे खेडे गाव आहे.
•येथील लोकसंख्या १५००० हजारच्या वर आहे.
•येथील मुख्य व्यवसाय शेती आहे.
•तसेच सुतारकाम,लोहारकाम आदि छोटे मोठे व्यवसाय आहे.
•गावात ३ शाळा आहेत. एक जिल्हा परिषद शाळा आहे. तर एक उच्च्य माध्यमिक विद्यालय आहे. तसेच एक इंग्लिश स्कूल आहे.
•गावात विद्यार्थी संख्या २००० च्या वर आहे.
••गावातील मध्यभागातून मुख्य रस्ता जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने आणि काही घरे आहेत.
•तसेच गावाच्या शेवटच्या टोकापासून एक महत्त्वाचा रस्ता जातो.
•गाव हे राष्ट्रीय महामार्गापासून फक्त 5 किमी. दूर आहे.
•गावाच्या प्रत्येक गल्ल्यात सिमेंट रस्ते आहेत.•गावातील घरे ही सिमेंटची आहे.
•तसेच गावात मकानाची घरे सूद्धा आहेत.
घरे ही एकमेकांना चिकटलेली आहे.
गावातील वातावरण हे उष्ण आणि दमट आहे.
इतिहास
[संपादन]छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे.
रोहिलागड हा किल्ला जालना जिल्हातील एकमेव किल्ला आहे.सद्स्थितीला तो दुर्लक्षित आहे.
गावात अनेक प्राचीन मंदिरे व त्या शेजारी भव्य कोरीव कामाच्या मूर्ती व शिलालेख पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
पत्ता
[संपादन]रोहिलागड
तालुका:अंबड
जिल्हा:जालना
पिन कोड 431121 अंबड तालुका हा होळकरांच्या अधिपत्याखाली होता महिदपुर करारानंतर निजामाच्या अधिपत्याखाली तालुका आला आहे तर अंबड हे गौतमाबाईसाहेब होळकर यांना खाजगीसाठी अंबड परगणा पेशवे दरबारातुन मिळाले होते
रोहिलागड हा येथे दोन कोरीव लेण्या असुन त्या अर्धवट आहे तर डोगंरावर काही बुरुज तसेच तटाचे अस्तित्त्व आहे तर शेजारच्या नांदीच्या डोगंरावर एक अर्धवट कोरीव लेणी असुन पूर्वी तेथे गौळी राजाचे वास्तव्य होते पायथ्याला गौळवाडी नावाचे गाव होते खिलजीच्या काळात गौळवाडीच्या गवळी व गोपाळांचे धंर्मातर झाले असून नांदी गावात रंगीबेरंगी दगडाचे मोठमोठे साठे आढळतात निजामाने या दगड उपशावर बंदी घातली होती मात्र संशोधनाअभावी इथे आजही मोठ्या प्रमाणात दगड उपसा होतो रोहिलागड, नांदी,भोकरदन येथील लेण्या एकच आहेत
रोहिलागड गावात तीन शिलालेख असून दोन शिलालेख देवनागरीत असुन ते प्रवेशद्वार अर्थात वेशीवर असुन एक दर्ग्यात आहे यापैकी एकाच शिलालेखाचे वाचन झालेले आहेत प्राचीन अस्तीत्वाच्या खाणाखुणा या गावात पहायला मिळतात तट्टु,टकले,गुंजाळ, वैद्य तसेच इतर आडनावाची माणसे गावात राहतात.
फिरंगाई माता,लेणी,भुयार, दर्गा,मंदिर, वेस,शिलालेख या गावात असुन अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे
गावाच्या लेण्यांतील भुयाराची आख्यायिका रोहिलागड दौलताबाद किल्ला संबधी असून कधीकाळी गुंजाळ पाटील धनगरांची मेंढी लेणीतील भुयारातून दौलताबाद किल्ल्यातील भुयारात निघाली असल्याचे बोलले जाते
- रामभाऊ लांडे