प्रभाकर जठार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. प्रभाकर जठार हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी संगीत, नाटके आणि त्यांतील कलावंत यांवर लिखाण केलेले आहे.

जठार यांनी शंकरराव मोहिते यांजकडून संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतले. त्यांनी पुणे येथे दीनानाथ मंगेशकरांकडून गंडा बांधून त्यांनी पुढचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. दीनानाथांच्या निधनानंतरच हे शिक्षण थांबले. डॉ. वंदना रवींद्र घांगुर्डे या जठारांच्या शिष्या होत.

इंदूर मराठी साहित्य सभेने प्रसिद्ध केलेल्या कल्पवृक्ष कन्येसाठी या पुस्तकात प्रभाकर जठार यांनी सुरों के दीवाने दीनानाथ नावाचा लेख लिहिला होता. कालजयी कुमार गंधर्व या द्विखंडी ग्रंथातही जठारांचा लेख आहे.

पुस्तके[संपादन]

  • दिना दिसे मज दिनरजनी (दीनानाथ मंगेशकर या आपल्या गुरूंचेे आत्मीयतेने काढलेले व्यक्तिचित्र आणि त्यांच्या गायकीचे निःपक्षपातीपणाने केलेले विश्लेषण)
  • स्वरसौहार्द (संगीत क्षेत्रातील एकवीस विख्यात कलाकारांचा परिचय करून देण्यारे पुस्तक)