रॉबर्ट डुव्हाल
American actor and director (1931-2026) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | जानेवारी ५, इ.स. १९३१ सॅन डियेगो Robert Selden Duvall | ||||
| मृत्यू तारीख | फेब्रुवारी १५, इ.स. २०२६ (९५) Middleburg | ||||
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| कार्य कालावधी (अंत) |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| कार्यक्षेत्र |
| ||||
| पूर्वजांचे घर | |||||
| वडील |
| ||||
| आई |
| ||||
| वैवाहिक जोडीदार |
| ||||
| कर्मस्थळ | |||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रॉबर्ट सेल्डन डुव्हाल (५ जानेवारी, १९३१ - १६ फेब्रुवारी, २०२६) हा एक अमेरिकन अभिनेता होता. आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत त्याने ऑस्कर पुरस्कार, चार गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार जिंकले.[१][२][३]
कारकीर्द
[संपादन]डुव्हालची कारकीर्द सात दशकांहून अधिक काळ होती. त्यानने चित्रपट, दूरदर्शन आणि रंगमंचावर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. १९६२ च्या टू किल अ मॉकिंगबर्ड चित्रपटातील बो रॅडली ही त्याची पहिली प्रमुख चित्रपट भूमिका होती.
१९७० च्या दशकात डुव्हालने द गॉडफादर (१९७२) आणि द गॉडफादर २ (१९७४) मध्ये टॉम हेगनची भूमिका केली. ॲपोकॅलिप्स नाऊ (१९७९) मधील लेफ्टनंट कर्नल बिल किलगोर ही त्यांची भूमिका अत्यंत गाजली. [४] नंतर टेंडर मर्सीज (१९८३) मधील 'मॅक स्लेज या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार. याशिवाय त्यांनी जज (२०१४) आणि विडोझ (२०१८) यांसारख्या चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका केल्या.
त्यांनी द ट्वायलाइट झोन आणि लोनसम डव्ह सहित अनेक प्रसिद्ध दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले आहे. [५]
निवडक सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]डुव्हालला अनेक प्रतिष्ठित जागतिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना सात वेळा अकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले असून त्यांनी एकदा हा पुरस्कार जिंकला आहे.
| वर्ष | पुरस्कार | श्रेणी | चित्रपट / मालिका |
|---|---|---|---|
| १९८३ | अकॅडमी पुरस्कार | सर्वोत्तम अभिनेता | टेंडर मर्सीज |
| १९७९ | गोल्डन ग्लोब पुरस्कार | सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता | ॲपोकॅलिप्स नाऊ |
| १९८३ | गोल्डन ग्लोब पुरस्कार | सर्वोत्तम अभिनेता - ड्रामा | टेंडर मर्सीज |
| १९८९ | गोल्डन ग्लोब पुरस्कार | सर्वोत्तम अभिनेता - मिनी सिरीज | लोनसम डव्ह |
| २००७ | एमी पुरस्कार | उत्कृष्ट मुख्य अभिनेता | ब्रोोकन ट्रेल |
| १९७२ | बाफ्टा पुरस्कार | सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता | द गॉडफादर |
इतर सन्मान
[संपादन]- नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स: २००५ मध्ये त्यांना अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स प्रदान करण्यात आले. [६]
- त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हॉलिवूड वॉक ऑफ फॅम वर एक तारा समर्पित करण्यात आला आहे.
संदर्भ
[संपादन]- ↑ Jerome, Jim (April 14, 2003). "Dance Fever". People. Vol. 59 no. 14. March 4, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 16, 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Robert Duvall is Staying Put on Broadway". The Baltimore Sun. February 22, 1977. December 9, 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ Bruce Beresford (actor), Robert Duvall (actor), Horton Foote (actor), Gary Hertz (director), Tess Harper (actress) (April 16, 2002). "Miracles & Mercies" (Documentary). West Hollywood, California: Blue Underground. October 2, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 28, 2008 रोजी पाहिले.
- ↑ "Robert Duvall Biography". britannica.com. 2026-02-17 रोजी पाहिले.
- ↑ "Robert Duvall Filmography". imdb.com. 2026-02-17 रोजी पाहिले.
- ↑ "National Medal of Arts - Robert Duvall". arts.gov. 2026-02-17 रोजी पाहिले.