Jump to content

रॅम सिकलीड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायक्रोजिओफगस रॅमिरेझी
[[चित्र:
Mikrogeophagus ramirezi imported from Columbia.jpg
Mikrogeophagus ramirezi imported from Columbia
|frameless|]]
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: Chordata
जात: Actinopterygii
वर्ग: Cichliformes
कुळ: Cichlidae
शास्त्रीय नाव
मायक्रोजिओफगस रॅमिरेझी
G. S. Myers & Harry 1948

इतर नावे
  • अ‍ॅपिस्टोग्रामा रॅमिरेझी G. S. Myers & Harry 1948
  • मायक्रोजिओफगस रॅमिरेझी G. S. Myers & Harry 1948
  • पॅप्लिओक्रोमीस रॅमिरेझी G. S. Myers & Harry 1948

रॅम सिकलीड, म्हणजेच मायक्रोजिओफगस रॅमिरेझी हा दक्षिण आफ्रिकेतील व्हेनेझुएला आणि कोलंबियाच्या तृणभूमीतून (गवताळ प्रदेशातून) वाहणाऱ्या ओरीनाको नदीपात्रात सापडणारा एक गोड्या पाण्यातील मासा आहे.[] माशांच्या वागणुकीचा अभ्यास करण्याकरिता या प्रजातीची तपासणी केली गेली आहे [] तसेच शोभिवंत मत्स्यपालन छंदात हा मासा अतिशय लोकप्रिय आहे. हा मासा अनेक उपनाव किंवा सामान्य नावाने प्रसिद्ध आहे, ही सामान्य नावे इंग्रजी भाषेतच सर्वत्र प्रचलित आहेत उदाहरणार्थ; रॅम, ब्ल्यू रॅम, जर्मन ब्ल्यू रॅम, एशियन रॅम, बटरफ्लाय सिकलीड, रॅमिरेझीज ड्वार्फ सिकलीड, ड्वार्फ बटरफ्लाय सिकलीड आणि रॅमिरेझी. [][][][] छोट्या सिकलीड माशांच्या प्रजातीतील Cichlidae या कुळातील आणि Geophaginae या जातकुळीतील मासा आहे.[]

वर्णन

[संपादन]
नर

निसर्गात सापडणारे रॅम सिकलीड हे मत्स्यालयात पैदास केलेल्या रॅम सिकलीडपेक्षा जास्त रंगीत असतात. असे का? तर चुकीच्या पद्धतीने प्रजनन घडवून आणणे, उठावदार रंग दिसण्यासाठी माशांना संप्रेरके टोचणे ही प्रमुख कारणे आहेत. शिवाय या अशा प्रयोगांमुळे चार नारांपैकी एक नर हा नपुंसक होतो.

नर माशाच्या पाठीवरील पराच्या (Dorsal fin) पुढील काही काटे हे इतर काट्यांपेक्षा थोडे लांब असतात. असे असले तरी, चुकीच्या प्रजनन पद्धतीमुळे काही माद्यांमधेही हे दिसून येते. जेव्हा प्रजननाची वेळ येते, तेव्हा मादीचे पोट गुलाबी किंवा लालसर होते. नरांप्रमाणे माद्यांच्याही पाठीवरील पराजवळ असणाऱ्या काळ्या ठिपक्याच्या बाजूने, निळ्या रंगाची चमक असते. परंतु फरक इतकाच कि, माद्यांच्या काळ्या ठिपक्याच्या आतील बाजूसही विरळ असे निळे ठिपके असतात. नर जास्तीत-जास्त १० सेंटीमीटरपर्यंत वाढतात तर माद्या थोड्या लहान असतात.

वितरण आणि अधिवास

[संपादन]

व्हेनेझुएला आणि कोलंबियाच्या लॉझ जानोस नामक तृणभूमीमुळे M. ramireziचा नैसर्गिक अधिवास हा उबदार (२५.५ ते २९.५° से, ७८ ते ८५° फॅ), आणि आम्लीय ( पीएच ५.२ ते ६.७) प्रकारचा आहे.[][][] या भागात पाणी संथ वाहत असून पाण्यात विरघळलेली खनिजे आणि वनस्पतींपासून तयार झालेले आम्ल असल्यामुळे काही ठिकाणी पाणी पारदर्शक तर काही ठिकाणी गढूळ दिसते. ही प्रजात पाण्यात बुडालेल्या गवताळ भागात किंवा पाणवनस्पतींमध्ये आढळून येते.

पुनरुत्पादन

[संपादन]
फलित न झालेली ब्ल्यू रॅमची अंडी

काहीवेळा, काही अंडी ही फलित होत नाहीत.

फलित न झालेली ब्ल्यू रॅमची अंडी (जवळून)

परंतु, काहीवेळा अंडी फलित होतच नाहीत, याचे कारण, ज्या जोडीने अंडी घातलेली आहेत त्या जोडीपैकी एकाचे किंवा दोघांचेही चुकीच्या पद्धतीने प्रजनन झाल्याची शक्यता असते.

चित्र:Territorialdefence1.jpg
मत्स्यालयात जागा निवडून हद्द ठरविण्यासाठी एम. रॅमिरेझी माद्यांमध्ये चाललेले द्वंद्व.

रॅम हा मत्स्यालयात स्वतःचे क्षेत्र करून राहणारा मासा आहे. त्यातही, प्रजननावेळी नर आणि मादी, दोघेही आक्रमक होतात. ज्याठिकाणी अंडी असतील, त्याठिकाणी इतर माशांना येऊ देत नाहीत.

A ram cichlid showing a blue colour morph
इलेक्ट्रिक ब्ल्यू रॅम सिकलीड

लैंगिकदृष्ट्या परिपक्व झाल्यावर, रॅम सर्वप्रथम जोडीदार निवडतात. रॅम नर एकपत्निक असतात, म्हणजेच जोपर्यंत ते एकत्र आहेत, तोपर्यंत जोडी तुटत नाही. मत्स्यालयात इतर कितीही नर असले, तरी प्रजनन निवडलेल्या जोडीतच होते. तेव्हा जोडी तयार झाली कि नर इतर नरांना सहन करत नाहीत.[] सदर प्रजात चपट्या दगडावर ०.९ ते १.५ एमएम आकाराची चिकट असणारी अंडी चिकटवतात.[][] किंवा थेट वाळूत तयार केलेल्या छोट्या खड्ड्यात चिकटवतात.[] इतर अनेक सिकलीड माशांप्रमाणे, एम. रॅमिरेझी दोन्ही, नर आणि मादी पिल्लांचे संगोपन करतात. मादी एकावेळी १५० ते ३०० अंडी घालते,[] काही माद्यांनी एकावेळी 500 पर्यंत अंडी घातल्याचीही नोंद आहे. अंडी घालून झाल्यावर नर-मादी दोघेही, अंड्यांना सतत ऑक्सिजन मिळण्यासाठी त्यांच्या परांनी अंड्यांच्या ठिकाणचे पाणी हलवत राहतात. २९° से (84° फॅ) तापमानात पुढील ४० तासांत अंडी उबतात.

ब्ल्यू रॅमची मादी अंड्यांजवळील पाणी हलवते आहे.

नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या माशांच्या पिल्लांना इंग्रजीत 'लार्वा' असे म्हणतात. या प्रजातीचे लार्वा पुढील पाच दिवस दगड, पाणवनस्पती अशा ठिकाणांना डोक्यावर असलेल्या चिकट धाग्यांच्या मदतीने चिकटलेली असतात. पाच दिवसांनंतर, नर आणि मादी, दोघांपैकी कोणीही, पिल्लांना खाण्यासाठी प्रवृत्त करून दाट कळपाने फिरवतात आणि अन्न शोधण्यासाठी मदत करतात.[]

वर्गीकरण, संग्रह आणि व्युत्पत्ती

[संपादन]

शोभिवंत मत्स्यपालन छंदात व्यापारी उद्देशाने ही प्रजात आयात करणारे आणि संग्रहकर्ता, मॅन्युएल रॅमिरेझ यांच्या नावावरून या माशाला रॅम सिकलीड हे नाव देण्यात आले.[१०] जॉर्ज एस मायर्स आणि आर.आर हॅरी (1948) यांनी प्रथमतः या माशाची ओळख अ‍ॅपिस्टोग्रामा रॅमिरेझी (Apistogramma ramirezi) अशी करून दिली, परंतु यानंतरही अनेक जीव नावांतून आणि कुळातून या माशाची वर्णने समोर आली ती पुढीलप्रमाणे: मायक्रोजिओफगस (Microgeophagus), पॅप्लिओक्रोमीस (Papiliochromis), सुडोअ‍ॅपिस्टोग्रामा (Pseudoapistogramma) आणि सुडोजिओफगस (Pseudogeophagus).[११]

मत्स्यालय मध्ये

[संपादन]
झेंथस्टिक प्रकारातील एम. रॅमिरेझी

उष्णकटिबंधीय गोड्या पाण्यातील सामुदायिक मत्स्यालयात रॅम सिकलीड अतिशय लोकप्रिय आहे. इतर बरेचसे सिकलीड सामुदायिक मत्स्यालयासाठी अपात्र ठरतात मात्र या प्रजातीचे तसे नाही, नर आणि मादी, अशी जोडी जरी सामुदायिक मत्स्यालयात ठेवली गेली तरी चालते.

शोभिवंत मत्स्यपालन छंदसाठी आशियामध्ये एम. रॅमिरेझी माशाचे बरेच वाण विकसित केले गेले आहेत जसे कि झेंथस्टिक (लाल रंगद्रव्याचा अभाव असणे). यामधे गोल्ड रॅम किंवा इलेक्ट्रिक ब्लू हे मोठ्या परांचे, मोठ्या शरीराचे, जाड "बलून" पद्धतीचे आणि लांब-बारीक परांचे अशा अनेक प्रकारांत विकसित केले गेले आहेत.[][] यापैकी बऱ्याच वाणांना वन्य-प्रकारातील नमुन्यांच्या तुलनेत कमी प्रजनन, आरोग्याच्या समस्या आणि पिल्लांची काळजी घेण्यास असमर्थ अशा अनेक समस्या भेडसावतात.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Froese, R. and D. Pauly. Editors. "संग्रहित प्रत". 2016-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-13 रोजी पाहिले.
  2. ^ Robins CR, Bailey RM, Bond CE, Brooker JR, Lachner EA, Lea RN, Scott WB (1991) World fishes important to North Americans. Exclusive of species from the continental waters of the United States and Canada. Am. Fish. Soc. Spec. Publ. 21: p. 243.
  3. ^ a b c d e Linke H, Staeck L (1994) American cichlids I: Dwarf Cichlids. A handbook for their identification, care and breeding. Tetra Press. Germany. आयएसबीएन 1-56465-168-1
  4. ^ a b c Riehl, Rüdiger. Editor.; Baensch, HA (1996). Aquarium Atlas (5th ed.). Germany: Tetra Press. ISBN 3-88244-050-3.
  5. ^ a b c d Loiselle, Paul V. (1995). The Cichlid Aquarium. Germany: Tetra Press. ISBN 1-56465-146-0.
  6. ^ Axelrod HR, Vorderwinkler W (1995) Encyclopedia of tropical fishes 30th Edn. TFH Publications, USA.
  7. ^ ITIS Report. https://www.itis.gov/servlet/SingleRpt/SingleRpt?search_topic=TSN&search_value=649520. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ a b Richter H-J (1989) Complete book of dwarf cichlids. Tropical Fish Hobbyist, USA
  9. ^ Coleman RM, Galvani AP (1998) Egg Size Determines Offspring Size in Neotropical Cichlid Fishes (Teleostei: Cichlidae) Copeia 1:209-213.
  10. ^ Leibel WS (1993) A fishkeepers guide to South American Cichlids. Tetra Press. Belgium. 55-56.
  11. ^ Robins CR, Bailey RM (1982) The Status of the Generic Names Hey Im A Fish, Pseudoapistogramma, Pseudogeophagus and Papiliochromis (Pisces: Cichlidae) Copeia 1: 208-210.