राही अनिल बर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


राही अनिल बर्वे (जन्म ४ जून १९७९) उपाख्य राही बर्वे एक भारतीय लेखक, दिग्दर्शक, व पटकथालेखक व विशेष दृश्यपरिणाम (व्हीएफएक्स) कलाकार आहेत [१] राहीच्या उल्लेखनीय कामांमध्ये मांझा हा लघुपट [२] , व ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रदर्शित होणारा तुंबाड हा चित्रपट आहे. [३]

प्रारंभिक आयुष्य[संपादन]

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

राही हे मराठी लेखक व कथाकार अनिल बर्वे व बॅंक अधिकारी प्रेरणा बर्वे या दांपत्याचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. लहान वयापासूनच राहीचा ओढा कथालेखनाकडे व चित्रपटांकडे होता. चित्रपटसृष्टीशी संबंधित दृष्यपरिणाम तंत्रज्ञानात कारकीर्द घडवतानाच त्यांची ही लेखनाची आवड भक्कम होत गेली.

दिग्दर्शन[संपादन]

२००८ साली राहीने 'मांझा' या पहिल्या लघुपटावर काम सुरू केले. झोपडपट्टीतला एक मुलगा, त्याची अज्ञान बहीण व एक विकृत पोलीस शिपाई यांच्यात गुंफलेली ही सूडकथा आहे. अत्यंत काटकसरीत बनलेला [४], हा लघुपट त्याचा बाज, दृष्यसौंदर्य, संहिता, अभिनय अशा मूल्यांसाठी वाखाणला गेला.[५] 'मांझा' लघुपटास पाश्चात्य दिग्दर्शक डॅनी बायल ( Danny Boyle ) यांनी आपल्या स्लमडॉग मिलियनेअर ( Slumdog Millionnaire ), चित्रपटाच्या ब्लू-रे तबकडीत उल्लेखनीय म्हणून समाविष्ट करत मांझाची पोच व ओळख वाढवली. [६]

त्यानंतर २००९ साली, राहीने 'तुंबाड' या मुख्यप्रवाहातील त्यांच्या पहिल्या भयपटाची निर्मिती सुरू केली. २०१५ पर्यंत चित्रीकरण संपूनही तुंबाड एकूण नऊ वर्षं बासनात अडकून बसला होता. मात्र राजकुमार हिरानींसारख्या ख्यातनाम दिग्दर्शकाने तुंबाडबद्दल ट्वीट केलेल्या स्तुतीने [७] चित्रपटाबद्दलच्या कुतूहलास हातभार लावला. जुलै २०१८ मध्ये तुंबाडची पहिली झलक प्रसृत करून ऑक्टोबर २०१८मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.

वैयक्तिक परिचय[संपादन]

राहींना विचारवंत, लेखक, कलाकार आप्तांचा वारसा लाभला आहे. वडील अनिल बर्वे हे हमिदाबाईची कोठी सारख्या नावाजलेल्या नाटकांचे लेखक होत.[८] राहीचे आजोबा शाहीर अमर शेख संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्यांत आघाडीवर होते. राहीच्या मावशी[९] व लेखिका मलिका अमर शेख यांचा विवाह कवी व दलित कार्यकर्ते नामदेव ढसाळ, यांच्याशी झाला होता. [१०] मराठी सिनेसृष्टीतील नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, राहीच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. [११]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Touching Indifference". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-10-18 रोजी पाहिले.
 2. ^ "Indian Short Film Manjha in Slumdog Blue-ray Disc". IMDb. 2018-10-18 रोजी पाहिले.
 3. ^ "Sohum Shah's Tumbbad gets a release date, Here's all you need to know". dna (इंग्रजी भाषेत). 2018-07-04. 2018-10-18 रोजी पाहिले.
 4. ^ Raphael, Amy (2013-04-02). Danny Boyle: Authorised Edition (इंग्रजी भाषेत). Faber & Faber. ISBN 9780571301874.
 5. ^ O'Neill, Phelim. "DVD review: Slumdog Millionaire". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2018-10-18 रोजी पाहिले.
 6. ^ "Danny Boyle has chosen short film Manjha to be a part of Sm Blu-ray disc". IMDb. 2018-10-18 रोजी पाहिले.
 7. ^ "Rajkumar Hirani on Sohum Shah's Tumbad : Haven't seen a more visually stunning film in a long time". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-05-22. 2018-10-18 रोजी पाहिले.
 8. ^ Natarajan, Nalini; Nelson, Emmanuel Sampath (1996). Handbook of Twentieth-century Literatures of India (इंग्रजी भाषेत). Greenwood Publishing Group. ISBN 9780313287787.
 9. ^ "Review: I Want to Destroy Myself: A Memoir by Malika Amar Shaikh". https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2018-02-02. 2018-10-18 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)
 10. ^ "Love's Backyard, A Scorched Soul". https://www.outlookindia.com/. 2018-10-18 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)
 11. ^ "काय 'ब्र' लिहावं?". Loksatta. 2018-01-26. 2018-10-18 रोजी पाहिले.