चर्चा:राही अनिल बर्वे
Appearance
जाहिरातबाजी आणि स्तुतीपर मजकूर
[संपादन]Untitled
[संपादन]- प्रस्तुत लेख इंग्रजी आणि मराठीमध्ये ह्याच सदस्याने केलेले आहेत, इंग्रजीमध्ये मी तो लेख जाहीरातबाजी म्हणून नोंदवलेला आहे. तसेच इथेही नोंदवत आहे.
- आगामी चित्रपटाच्या जाहिरातीसाठी प्रस्तुत पान तयार केले गेले असावे असे मला वाटते.
- शिवाय सध्याच्या लेखाची भाषा स्तुतीपर शब्दांनी भारलेली आहे. त्यामुळे प्रचालकांनी योग्य तो निर्णय घ्यावा. WikiSuresh (चर्चा) १४:४५, ९ जुलै २०१८ (IST)
सविस्तर खुलासा अपेक्षित
[संपादन]- स्तुतिपर शब्दांच्या जागी वस्तुनिष्ठ शब्दयोजना अवश्य वापरावी.
- बहुचर्चित असणे, वाखाणणी होणे यांना ऑनलाइन संदर्भ दिले असल्याने ही साधार विधाने असून जाहिरातबाजीचं आपलं निरीक्षण विवादास्पद ठरू शकतं.
- एखाद्या तथ्याला इथे ऑनलाइन, त्रयस्थ संदर्भ नसल्यास जरूर निदर्शनास आणावे. ते संदर्भ जोडले जातील.
- प्रस्तुत पानाचा उद्देश जाहिरातबाजीचा नसून आजवर सदर व्यक्ती व त्याच्या कार्याबद्दल सार्वजनिक ज्ञानस्रोतांमध्ये जी माहिती आहे तिची नस्ती बेतण्याचाच आहे. त्या अनुषंगाने चित्रपटाबद्दल त्रोटक माहितीच नमूद आहे.
- "मला वाटते" या धाटणीच्या विधानांना-माहितीलाच विकीपीडियाचं समर्थन नसल्याने व्यक्तिगत मतांना सबळ आधाराने बळकटी दिल्याशिवाय संपादकीय विवेकाच्या आड येऊ देऊ नये.
- शिवाय येथील माहितीत आगामी चित्रपटाचं सविस्तर वर्णन नाही (चित्रपटविषयक पानांचे दुवे पाहावेत). हे पान एका व्यक्तीचा परिचय, व त्या व्यक्तीशी संबंधित इतर व्यक्तींचा उहापोह करते.
- आपणास ज्या तथ्यांविषयी शंका वा ज्या मांडणीविषयी तक्रारी आहेत, त्यांना साधार ठळक करण्याची साधनं निदान इंग्रजी विकिपीडियात आहेत. येथील नवखेपणामुळे मराठी संपादनात ती साधनं असल्याचे माहित नाही. आपण प्रत्यक्ष लेखातील आक्षेपार्ह ओळी उद्धृत केल्यास जास्त मदतशीर ठरेल.
खुलासा
[संपादन]- प्रिय @Yogesh V Damle:, आपण हे पान ह्या दोनहीं लेखांच्या सुधारणेसाठी पहावे. आपल्याला स्वत:लाच आपल्या चुका लक्षात येतील. दुर्दैवाने मराठीत अशी समॄध्द पाने उपलब्ध नाहीत.
- अमुक माणसाचा आजा, मावशी, काका, मामा हे मोठे व्यक्ती होते किंवा आहेत ही शैली बोलीभाषेतील आहे, विश्वकोशीय लिखाणात अश्या स्वरुपाची विधाने वापरणे रास्त नाही.
- महान, मोठे, प्रसिद्ध, असे शब्द विश्वकोशात वापरले जात नाहित, येथे संख्या आणि तथ्ये संदर्भासहित मांडावी लागतात.
- शिवाय नुसते त्रयस्त संदर्भ असून भागत नाही, कारण असे संदर्भ काही पुस्तकांचे लेखक/अनुवादक म्हणून माझ्याबद्दल आणि पत्रकार म्हणून आपल्याबद्दलही दिले जाऊ शकतात. म्हणून आपल्या दोघांच्या नावाचे लेख विकिवर लिहीले जाऊ शकतात असा त्याचा अर्थ नाही.
- आपण येथे विश्वकोशात उल्लेखयनीय असण्याबद्दल बोलत आहोत हे कायम लक्षात ठेवावे,ती उल्लेखनीयता प्रत्यक्ष दीर्घकालीन सार्वजनिक विश्वात राहिल्यानेच मिळते आणि दिलेल्या संदर्भांमध्ये प्राथमिक उल्लेख म्हणून त्या व्यक्तिची नोंद असावी लागते.
- उपरोक्त उल्लेखीत नियमांमध्ये राही बर्वे ही व्यक्ती बसते असे मला वाटत नाही, आपण जर आवश्यक ती माहिती पुरवू शकलात तर उत्तमच, नाहीतर इंग्रजीवर हे पान टिकणे कठीण आहे.
बाकी आपण सूज्ञ असा. धन्यवाद WikiSuresh (चर्चा) १५:२१, ९ जुलै २०१८ (IST)
(ता.क. आपल्या चर्चापानावरील संदेशाखाली आपण सही करणे अपेक्षित आहे.)
आक्षेप कायम
[संपादन]- आपण दिलेल्या निकषांमध्ये न बसणारी पानं विकीपीडियावर कमी नाहीत. त्याने त्या व्यक्तीच्या कामात किंवा आगामी महत्वात उणेपण येत नाही.मॉडरेटर्स या प्रकारात हस्तक्षेप करतील ही अपेक्षा.
योगेश दामले (चर्चा) ११ जुलै २०१८, ११:१३ (भा. प्र. वे.)