मलिक मोहम्मद जायसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मलिक मोहम्मद जायसी नावाच्या सूफी कवीने इसवी सनाच्या सोळाव्या शतकात पद्मावत नावाचे कथाकाव्य लिहिले. हे काव्य अवधी भाषेत होते. या काव्याची नायिका चित्तोडची राणी पद्मिनी होती.

या 'पद्मावत' नावाच्या कथेवरूनच अनेक लोककथा, नाटके, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. संजय लीला भन्साळी यांनी या कथेवर 'पद्मावती' नावाचा हिंदी चित्रपट काढला. राजपुतांच्या प्रचंड विरोधानंतर या बोलपटाचे नाव कोर्टाच्या आदेशानुसार पद्मावत असे बदलण्यात आले.

मलिक मोहम्मद जायसीचा परिचय करून देणारे पुस्तक[संपादन]

  • सुफी कवी जायसी (लेखक - प्रा. डाॅ. विश्वास पाटील)

पद्मावती ऊर्फ राणी पद्मिनी हिच्यावरील मराठी साहित्य[संपादन]

  • महाराणी पद्मिनी (नाटक - पु.भा. भावे)
  • महाराणी पद्मिनी (मेधा इनामदार)
  • महाराणी पद्मिनी (श्री.पु. गोखले)
  • महाराणी पद्मिनी (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • राणी पद्मिनी (राजेंद्र देशपांडे)