फुलचिंचोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजीव गांधी माध्यमिक विद्यालय,फुलाचिंचोली या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

फुलचिंचोली हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गाव आहे. फुलचिंचोली पंढरपूरपासून सुमारे 25 किमी. अंतरावर आहे.

गावामध्ये भैरवनाथाचे मोठे मंदीर आहे. भैरवनाथ देवाची यात्रा एप्रिल या महिन्यात असते. गावामध्ये यात्रेच्या आधी भैरवनाथ हा देव चार दिवस सोनारी ह्या गावातुन निघतो. वालग मंडळी देवाच्या पालकीसोबत असतात. सकाळी सात वाजता देव हा फुलचिंचोली गावात पोहोचतो. ही यात्रा तीन दिवस असते. यात्रेच्या पहिल्यादिवशी रात्री लहान मुलांनचे स्नेहसंमेलन असते. दुसऱ्या दिवशी लावणीचा कार्यक्रम असतो तर तिसऱ्या दिवशी कुस्त्ती चा कार्यक्रम असतो.

शैक्षणिक संस्था[संपादन]

  • राजीव गांधी माध्यमिक विद्यालय - या विद्यालयात ५वी ते १०वी वर्ग भरतात. शाळेत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नकाते आहेत.