राकेल वेल्च
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| स्थानिक भाषेतील नाव | Raquel Welch |
| जन्म-नाव | Jo Raquel Tejada |
| दिलेले नाव | Raquel |
| आडनाव | Welch |
| टोपणनाव | Raquel Welch |
| जन्म तारीख | ५ सप्टेंबर 1940 |
| जन्मस्थान | शिकागो |
| मृत्यू तारीख | १५ फेब्रुवारी 2023 |
| मृत्यूस्थान | लॉस एंजेल्स |
| मृत्युची पद्धत | नैसर्गिक कारणे |
| मृत्युचे कारण | cardiac arrest |
| वडील | Armando Carlos Tejada Urquizo |
| आई | Josephine Sarah Hall |
| वैवाहिक जोडीदार | André Weinfeld, Patrick Curtis, Richie Palmer |
| अपत्य | Tahnee Welch |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| कार्यक्षेत्र | film acting |
| शिक्षण घेतलेली संस्था | San Diego State University |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 1964 |
| कार्य कालावधी (अंत) | 2017 |
| Ethnic group | Bolivians |
| केसांचा रंग | brown hair |
| डोळ्यांचा रंग | brown |
| वैद्यकीय स्थिती | अल्झायमर रोग |
| वाद्य | voice |
| पुरस्कार | star on Hollywood Walk of Fame, Golden Globe Award for Best Actress in a Motion Picture – Musical or Comedy |
राकेल वेल्च तथा जो राकेल तेहादा (५ सप्टेंबर, १९४०:शिकागो, इलिनॉय, अमेरिका - ) ही अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका आहे. हिने इंग्लिश चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला.
कौटुंबिक माहिती
[संपादन]वेल्चचे वडील आर्मांदो कार्लोस तेहादा उर्किझो हे बोलिव्हियामध्ये जन्मलेले विमानअभियंता होते तर आई जोसेफिन सॅराह हॉल ही स्थापत्यशास्त्रज्ञ एमेरी स्टॅनफर्ड हॉलची मुलगी होती. वेल्च आपल्या आईकडून मेफ्लॉवर जहाजातून आलेल्या लोकांपर्यंत आपले कूळ सांगू शकते.
कारकीर्द
[संपादन]वेल्चने नाट्यशास्त्रात शिष्यवृत्ती मिळवून सान डियेगो स्टेट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे असतानाच वयाच्या १९व्या वर्षी द रमोना पॅजंट या उघड्यावर होणाऱ्या नाटकात प्रमुख भूमिका केली. त्यानंतर तिला सान डियेगोमधील दूरचित्रवाणी केन्द्रावर हवामान सांगण्याचे काम मिळाले. त्यानंतर काही काळाने वेल्चने शिक्षण सोडले. आपला नवरा जेम्स वेल्चपासून घटस्फोट घेतल्यावर राकेल आपल्या मुलांसह डॅलस येथे स्थलांतरित झाली व तेथे तिने लहानमोठी कामे केली. १९६३मध्ये आधी न्यू यॉर्क व नंतर लॉस एंजेलसला राहण्यास गेल्यावर राकेल वेल्चने चित्रपटांतून भूमिका करण्यास सुरू केले. आपण लॅतिना असल्याचे उघड न करण्यासाठी तिच्या एजंट[मराठी शब्द सुचवा] (आणि नंतरचा पती) पॅट्रिक कर्टिस व तिने राकेलच्या भूतपूर्व पती जेम्स वेल्चचे आडनाव लावणे सुरू केले. १९६४ पासून तिला अनेक चित्रपटांतून प्रमुख भूमिका मिळाल्या व तिची कारकीर्द सुरू झाली.