रवी (घुसळणी)
Appearance
रवी हे ताक व अन्य काही पदार्थ घुसळण्याचे साधन आहे.
पार्श्वभूमी
[संपादन]या साधनाद्वारे प्रामुख्याने ताक घुसळले जाते. रवी हे साधन लाकडापासून, प्लास्टिकपासून, लोखंडापासून, व काही इतर धातूंपासून बनवलेले असते. या साधनाचा वरचा भाग तळाहाताने घासत खालील भांड्यातील पदार्थ घुसळला जातो.
विद्युत घुसळणी
[संपादन]आधुनिक काळातील विद्युत घुसळणी हे रवीऐवजी वापरले जाणारे यंत्र आहे. हे यंत्र विद्युत उर्जेवर चालते. या यंत्राद्वारे श्रम वाचते.
पौराणिक संदर्भ
[संपादन]पुराणातील समुद्रमंथन करताना देव व दानव यांनी मेरू पर्वताचा रवीसारखा आणि वासुकी नागाचा दोर केला. या घुसळणीतून १४ रत्ने निघाली असे मानले जाते.