वीज
विजाणूंच्या (eng- Electrons) (विद्युत प्रभाराच्या) प्रवाहामुळे तयार होणारी कोणतीही क्रिया. (इंग्रजी: Electricity, Electric)

विजेचा शोध सर्व प्रथम Thomas Elva Edision याने लावला.त्याने एकूण ९९ वेळा प्रयत्न केल्यानंतर १०० व्या वेळी जेव्हा त्याने प्रयोग केला तेव्हा त्याला त्यात यश प्राप्त झाले. त्या पूर्वी त्याला सर्वांनी बिन कामाचा म्हणून खूप वेळा हिणवले.
विद्युत प्रभाराची उपस्थिती इलेक्ट्रोस्टॅटिक शक्तीला जन्म देते.विद्युत प्रभार एकमेकावर बल लावतात, ज्याचा परिणाम प्राचीन काळामध्ये ज्ञात होता, पण तो तेव्हा समजला नव्हता.एका काचेच्या कांडीला कपड्याने घासून प्रभारित करून त्या काचेच्या कांडीचा स्पर्श एका हलक्या लटकवून ठेवलेल्या चेंडूला केला तर तो चेंडू प्रभारित होतो.जर समान चेंडू समान काचेच्या कांडीने प्रभारित केला असेल तर,तो पहिल्या चेंडूला विकर्षित करतो. विद्युत प्रभार दोन चेंडूवर बल लावून एकमेकांपासून दूर करतो.एम्बर कांडीने घासलेले दोन चेंडू सुद्धा एकमेकांना विकर्षित करतात. तथापि, जर एक चेंडू काचेच्या कांडीने प्रभारित केला आणि दुसरा एम्बर कांडीने तर, दोन चेंडू एकमेकांना आकर्षित करतात.या घटनेचा शोध अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चार्ल्स-अगस्टिन डी कुलोम्ब यांनी शोधला होता.
प्रभार एकमेकांवर बल लावतात , म्हणूनच प्रभार स्वतःहून जास्तीत जास्त तितक्या समप्रमाणात प्रसारित करण्याची त्यांची प्रवृत्ती असते.