Jump to content

रविकांत तुपकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रविकांत तुपकर

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ
कार्यकाळ
२०१५ ते २०१७

जन्म १३ मे, १९८५ (1985-05-13) (वय: ३९)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष स्वाभिमानी पक्ष
आई गीताबाई चंद्रदास तुपकर
वडील चंद्रदास मारोती तुपकर
पत्नी ॲड. शर्वरी रविकांत तुपकर
अपत्ये यज्ञजा व देवव्रत
निवास बुलढाणा
व्यवसाय शेती
धर्म हिंदू
संकेतस्थळ http://www.swabhimani.com/

रविकांत तुपकर हे महाराष्ट्रातील राजकारणी व चळवळीचे अग्रणी नेते आहेत. ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत[].[] ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते[] आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते. []त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. सर्व सामान्य,शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.[] ते आपल्या अभ्यासू, परखड व आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत व युवकांमध्ये त्यांची विशेष क्रेज आहे. विद्यार्थी, तरुण, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आजवर अनेक आंदोलने केली आहेत[][] व त्यासाठी अनेकदा तुरुंगवासही भोगला आहे. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक,कला व क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सहभाग असतो.

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

रविकांत तुपकर यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सावळा या गावी झाला. []कला शाखेतून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.[]

राजकीय कारकीर्द

[संपादन]

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी शेतकरी चळवळीच्या कामाला सुरुवात केली. []त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कामाला सुरुवात केली. लवकर त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.[] २०१५ साली राज्यातील सरकारने त्यांना महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष केले व त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला.[] पण शेतकरी प्रश्नांवर सरकार संवेदनशील नसल्याने त्यांनी २०१७ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ही सांभाळली. []

शेतकरी,तरुण व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत अनेक आक्रमक आंदोलने केली[१०]. २०२१ साली त्यांनी सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी केलेले उपोषण देशभर गाजले व त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढ मिळून मोठा न्याय मिळाला.[११] महाराष्ट्रातील सोयाबीन-कापूस उत्पादकांचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते[१२].

भूषवलेली पदे

[संपादन]

प्रदेशाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना[].

अध्यक्ष, (राज्यमंत्री दर्जा) वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य.[][]

प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष, महाराष्ट्र राज्य[]

आजवर आंदोलनातील सहभाग

[संपादन]
  • २०२१ साली सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी केलेले अन्नत्याग आंदोलन.[१३][११][१४]
  • अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन केलेले आत्मक्लेश आंदोलन.
  • ऊस व दुध दरवाढ आंदोलन
  • बुलढाणा जिल्हा बँक आंदोलन
  • कृषी कायद्यांविरोधात रेल रोको आंदोलन[१५][१६]
  • कर्जमाफी साठी पुणे-मुंबई आत्मक्लेश पदयात्रा

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "स्वाभिमानीला 'लाल दिवा': सदाभाऊंऐवजी तुपकरांना मिळाले अध्यक्षपद". दिव्य मराठी.
  2. ^ माझा, उमेश अलोणे, एबीपी (2021-03-23). "अकोल्यातील केळी उत्पादकांच्या विम्याचा प्रश्न मार्गी, रविकांत तुपकरांच्या आंदोलनानं सूत्रं हलली". marathi.abplive.com. 2022-10-26 रोजी पाहिले.
  3. ^ तक, मुंबई. "स्वाभिमानी नेते रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली, कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न". Mumbai Tak. 2022-10-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-26 रोजी पाहिले.
  4. ^ a b c d author/lokmat-news-network (2018-04-12). "स्वाभीमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर; राजू शेट्टींनी केली घोषणा". Lokmat. 2022-10-26 रोजी पाहिले.
  5. ^ "बुलढाण्यात उद्या कृतज्ञता सोहळा; रविकांत तुपकरांसाठी लोकवर्गणीतून लोकरथ". Loksatta. 2022-10-26 रोजी पाहिले.
  6. ^ "नागपूर | शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानीचं भरीव पॅकेजच्या मागणीसाठी आंदोलन". 24taas.com. 2020-11-11. 2022-10-26 रोजी पाहिले.
  7. ^ "Buldhana : रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित". Maharashtra Times. 2022-10-26 रोजी पाहिले.
  8. ^ a b c मेहेरे, अतुल. "आंदोलनाचा धगधगता निखारा, शेतकऱ्यांची मुलूख मैदानी तोफ : रविकांत तुपकर". Sarkarnama. 2022-10-26 रोजी पाहिले.
  9. ^ a b ब्यूरो, सरकारनामा. "आजचा वाढदिवस : रविकांत तुपकर, आंदोलनातच नाही तर रचनात्मक कामातही पुढे...!". Sarkarnama. 2022-10-26 रोजी पाहिले.
  10. ^ "नागपूर | शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानीचं भरीव पॅकेजच्या मागणीसाठी आंदोलन". 24taas.com. 2020-11-11. 2022-10-26 रोजी पाहिले.
  11. ^ a b author/lokmat-news-network (2018-09-29). "सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- तुपकर". Lokmat. 2022-10-26 रोजी पाहिले.
  12. ^ ब्यूरो, सरकारनामा. "आता सोयाबीनवर स्टॉक लिमीट असणार नाही, तुपकर-पवार चर्चा यशस्वी…". Sarkarnama. 2022-10-26 रोजी पाहिले.
  13. ^ author/lokmat-news-network (2021-11-18). "स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात". Lokmat. 2022-10-26 रोजी पाहिले.
  14. ^ "स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी आंदोलनातून रात्रीच उचलले". 24taas.com. 2021-11-18. 2022-10-26 रोजी पाहिले.
  15. ^ India, Press Trust of (2020-12-08). "Farmers stop train in Maharashtra amid nationwide strike on new agri laws". www.business-standard.com (इंग्रजी भाषेत). 2022-10-26 रोजी पाहिले.
  16. ^ "मलकापूरात रेल्वे अडवली; रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात". ETV Bharat News. 2022-10-26 रोजी पाहिले.