Jump to content

रमा पायलट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रमा पायलट

जन्म १२ फेब्रुवारी, १९४८ (1948-02-12) (वय: ७६)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पती राजेश पायलट
अपत्ये २, सचिन पायलट सहीत

रमा पायलट (जन्म १२ फेब्रुवारी १९४८) ही राजस्थान राज्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची राजकारणी आहे. 13व्या लोकसभेत तिने दौसाचे प्रतिनिधित्व केले. तिने राजस्थान विधानसभेत हिंदोलीचे प्रतिनिधित्वही केले आहे.[]

प्रारंभिक जीवन

[संपादन]

रमाचा जन्म १२ फेब्रुवारी १९४८ रोजी शाकलपुरा, गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे चौधरी नैन सिंह आणि त्यांची पत्नी हरचंडी देवी यांच्या पोटी झाला.[] तिने श्याम लाल कॉलेज, नवी दिल्ली येथून एमए केले. त्या कॉलेजमध्ये तिने विद्यार्थी संघाचे सरचिटणीस म्हणून काम केले. तोने मेरठ विद्यापीठातून एलएलबी केले.[]

कारकिर्द

[संपादन]

रमा पायलट हिने १९९८ ची राजस्थान विधानसभेची निवडणूक हिंदोलीमधून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पोखरलाल सैनी विरुद्ध १५,५३० मतांनी जिंकली.[] तिचा नवरा राजेश पायलट हा लोकसभेचा सदस्य होता. २००० मध्ये कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्यानंतर, पोटनिवडणूक आवश्यक होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने रमाला उमेदवार म्हणून उभे केले. एकूण ६,६९,९८४ वैध मतांपैकी पायलटला ३,४९,४३९ (५२.१६%) मते मिळाली. भाजपचे उमेदवार आरके शर्मा २,८४,१७५ (४२.४१%) मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आले.[] खासदार म्हणून तिने ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कृषी आणि सल्लागार समितीवर काम केले.[]

तिने वसुंधरा राजे यांच्या विरोधात झालरापाटनसाठी निवडणूक लढवली पण ती पराभूत झाली.[][] २००३ च्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत तिला ४५,३८५ मते (३६.९२%) विरुद्ध राजे यांच्या ७२,७६० (५९.२०%) मते मिळाली.[] तिचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तिचा मुलगा सचिन पायलटला १४ व्या लोकसभेसाठी उमेदवारी दिली.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

रमाने १२ मार्च १९७४ रोजी राजेश पायलट यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. ११ जून २००० रोजी भंडाणा येथे राजेशचा कार अपघात झाला होता. त्याला जवळच्या सवाई मानसिंग रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाला.[][१०] तिने आपल्या पतीचे राजेश पायलट: अ बायोग्राफी नावाचे हिंदी भाषेतील चरित्र लिहिले.[११]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Bora, Kamla (4 September 2000). "Rama Pilot may be Congress nominee in Dausa". Rediff.com. 4 November 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Ashok Gehlot unveils Rajesh Pilot's statue near Dausa". The Times of India. 12 June 2012.
  3. ^ a b "Members Bioprofile: Pilot, Smt. Rama". Lok Sabha. 4 November 2017 रोजी पाहिले."Members Bioprofile: Pilot, Smt. Rama". Lok Sabha. Retrieved 4 November 2017.
  4. ^ "Statistical Report on General Election, 1998 to the Legislative Assembly of Rajasthan" (PDF). Election Commission of India. p. 121. 4 November 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "Bye-Election - September, 2000: Election to Parliamentary Constituency of Rajasthan: Constituency 7 Dausa". Election Commission of India. 4 November 2017 रोजी पाहिले.
  6. ^ Singh, DK (15 November 2003). "Rama Pilot to contest against Vasundhara Raje". Hindustan Times. Press Trust of India. 4 November 2017 रोजी पाहिले.
  7. ^ "State Elections 2004 - Partywise Comparison for 118-Jhalrapatan Constituency of Rajasthan". Election Commission of India. 4 November 2017 रोजी पाहिले.
  8. ^ "Provisional Key Highlights of the General Election 2003, to the Legislative Assembly of Rajasthan" (PDF). Election Commission of India. p. 20. 4 November 2017 रोजी पाहिले.
  9. ^ "Rajesh Pilot killed in road accident". The Hindu. 12 June 2000. 18 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 November 2017 रोजी पाहिले.
  10. ^ "Rajesh Pilot dies in road accident". The Tribune. Press Trust of India. 12 June 2012. 4 November 2017 रोजी पाहिले.
  11. ^ "Rajesh Pilot: A Biography (Hindi) 9789351940869 By Rama Pilot". Universal Book Sellers. 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 November 2017 रोजी पाहिले.