Jump to content

योशिझावा अकिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे जपानी नाव असून, आडनाव योशिझावा असे आहे.
योशिझावा अकिरा

योशिझावा अकिरा
पूर्ण नावयोशिझावा अकिरा
जन्म १४ मार्च, १९११ (1911-03-14)
कामिनोकावा, जपान
मृत्यू १४ मार्च, २००५ (वय ९४)
इताबाशी, जपान
कार्यक्षेत्र ओरिगामी

योशिझावा अकिरा (जपानी:吉澤 章; रोमन: Yoshizawa Akira) (१४ मार्च, इ.स. १९११ - १४ मार्च, इ.स. २००५) हा ओरिगामी कलेचा प्रणेता मानला जातो. त्याने या कलेला पुनरुज्जीवित केले. इ.स. १९८९ साली त्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार त्याने आपल्या कारकिर्दीत ५००००हून जास्त ओरिगामी कलाकृती बनवल्या. त्यापैंकी काही शेकडा कलाकृतीच त्याच्या १८ पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने नेहमीच जपानाचा सांस्कृतिक दूत म्हणून भूमिका निभावली. इ.स. १९८३साली, जपानी सम्राट हिरोहितो याने त्याला 'ऑर्डर ऑफ द रायझिंग सन' हा जपानी नागरिकांना मिळणाऱ्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक सन्मान देऊन गौरवले.