ओरिगामी
Jump to navigation
Jump to search
ओरिगामी ही एक पारंपरिक कला आहे. ओरि म्हणजे घड्या घालणे आणि गामी म्हणजे कागद. ओरिगामी या कलेचा उगम चीन मध्ये झाला व या कलेचा विस्तार व कलेची जोपासना जपानमध्ये झाली.
कलेची पार्श्वभूमी[संपादन]
ओरिगामी ही कला १९४० सालानंतर सर्वत्र पसरू लागली. ओरिगामी या कलेमध्ये पातळ चौकोनी कागद घेऊन तो कुठेहू न कापता त्याच्या घड्या घातल्या जातात व त्यापासून पक्षी, प्राणी, मासे, फुले असे आकार तयार केले जातात. अशा एकूण शंभर आकृत्या पारंपारिक पद्धतीत बनवल्या जातात. रंगबिरंगी कागदापासून केलेली कलाकृती हे ओरीगामिचे वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या कौशल्याने नवीन आकृत्या घडवण्याचा शोध घेतला जातो.
साहित्य[संपादन]
ओरिगामीसाठी पंधरा बाय तेवीस सेंटीमीटरचा कागद घेतला जातो. ओरिगामीसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाला ओशो असे म्हणतात.
संदर्भ[संपादन]
सृष्टीविज्ञान गाथा, राजहंस प्रकाशन, लेखक- डॉ. श्रीराम गीत