Jump to content

युलिया कान्चेवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युलिया कान्चेवा
जन्म Юлия Кънчева
१ जुलै १९५६ (1956-07-01)
सोफिया, बल्गेरिया
मृत्यू ११ जून, २०१९ (वय ६२)
सोफिया, बल्गेरिया
ख्याती बल्गेरियन अभिनेत्री, निर्माती आणि चित्रपट दिग्दर्शक


युलिया कान्चेवा (१९५६ - २०१९) ही एक बल्गेरियन अभिनेत्री, दूरदर्शन निर्माती आणि चित्रपट दिग्दर्शक होती. [१]

चरित्र[संपादन]

The National Academy for Theatre and Film Arts
थिएटर आणि चित्रपट कला नॅशनल ॲकॅडमी

युलिया कान्चेवाचा जन्म १ जुलै १९५६ला सोफिया मध्ये झाला. स.न. १९८० मध्ये तिने सोफियातील क्रॅस्टिओ सराफोव्ह नॅशनल ॲकॅडमी फॉर थिएटर अँड फिल्म आर्ट्समधून पदवी संपादन केली आणि प्राध्यापक येनको यानकोव्ह यांच्या वर्गात तिने चित्रपटाच्या दिग्दर्शनात विशेष गुण पटकावले. [२]

ती आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी असोसिएशन (आयडीए), तसेच नॅशनल युनियन ऑफ बल्गेरियन फिल्म मेकर्स आणि नॅशनल बल्गेरियन युनियन ऑफ जर्नालिस्टची सदस्य बनली. [३]

स.न. २००८ मध्ये न्यू बल्गेरियन विद्यापीठामध्ये तीला वर्षातील उत्तम शिक्षिका असल्याचा मान मिळाला [४]

तिच्या सक्रिय काळामध्ये, तिने १७ डॉक्युमेंटरी चित्रपट, दोन टीव्ही मालिका, एक लघु कथा, टिव्ही वर ५४ मिनिटांच्या दोन भागांत एक टीव्ही फीचर फिल्म आणि बल्गेरियन नॅशनल टेलिव्हिजन (बीएनटी)चे अनेक टीव्ही शोचे लेखन आणि दिग्दर्शन केले. . [५]

पुरस्कार[संपादन]

स.न. १९८९ मध्ये युलिया कान्चेवाला क्राकूफ, पोलंड मधील चित्रपट महोत्सवात "सिल्व्हर ड्रॅगन" हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार झिव्होटाट ई प्रेड नास (१९८८) या चित्रपटातीला कामासाठी मिळाला होता.

फिल्मोग्राफी[संपादन]

दिग्दर्शक किंवा निर्माता म्हणून[संपादन]

अभिनेत्री म्हणून[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Почина режисьорът и преподавател доц. Юлия Кънчева". nova.bg (bulgarian भाषेत). 2021-04-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ К. "Юлия Кънчева (1956 – 2019) – К" (बल्गेरियन भाषेत). 2021-04-23 रोजी पाहिले.
  3. ^ "доц. Юлия Кънчева - Кино и телевизия - НБУ". ecatalog.nbu.bg. 2021-04-23 रोजी पाहिले.
  4. ^ "Отиде си режисьорът Юлия Кънчева - Lupa BG". lupa.bg. 2021-04-23 रोजी पाहिले.
  5. ^ "300 близки и приятели изпратиха доц. Юлия Кънчева в последния й път". www.24chasa.bg. 2021-04-23 रोजी पाहिले.