जंतर मंतर
Appearance
(यंत्र मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)
जंतर मंतर अथवा यंत्र मंदिर ह्या खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वास्तू आहेत. इ.स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान जयपूरचे महाराजा जयसिंग ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये ह्या वेधशाळा बांधल्या. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित व भाकित करणे हा होता.