Jump to content

मोरघार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोरघार, धुंडूरा, शेंडूर्ली, मोर बाज किंवा हूम बाज (इंग्लिश:Indian Crested Hawk-Eagle; हिंदी:कलगीदार गरुड, शाहबाज; संस्कृत:भारत चुडाल श्येनक, वाजराज, शशादश्येन, सुपर्ण; गुजराती:मोरबाज) हा एक पक्षी आहे.

घारीपेक्षा मोठा,जंगलात राहणारा गरुड.त्यात विविध रंगपालट दिसून येतात.त्यामुळे ओळखायला कठीण.वरून उदी,खालून पांढरा.गळ्यावर लांबट काळ्या काड्या.छातीवर कथया रंगाच्या रेघोट्या.डोक्यावर लांब निमुळता तुरा.उडताना पंखाचे टोक गोलसर दिसते.लांबट शेपटी.पांढरे अंग.त्यावर उदी रंगाचे ठिपके.पंखाखालचा रंग करडा.त्यावर काड्या व ठिपके.त्यामुळे त्याला उडताना सहज ओळखता येते.नर-मादी दिसायला सारखे.मादी आकाराने मोठी.जंगलात एकटा आढळून येतो.

वितरण

[संपादन]

भारत द्वीपकल्प, माऊंट अबू, इटावा, शेरघाटी, कोलकाता आणि श्रीलंका.

निवासस्थाने

[संपादन]

पानगळीची आणि सदाहरितपर्णी जंगले.