मोनिका गजेंद्रगडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

मोनिका गजेंद्रगडकर (जन्म : ९ ऑक्टोबर १९६५). या मराठी लेखक कै. विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. त्या एम.ए. एम.फिल. आहेत.

कारकीर्द[संपादन]

महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ इत्यादी वृत्तपत्रांतून स्तंभ लेखिका म्हणून तसेच 'लोकप्रभा'सारख्या नियततालिकांमधून आणि विविध दिवाळी अंकांमधून त्यांनी विपुल कथालेखन केले आहे. इ.स. १९९५ सालापासून त्यांच्या कथा दिवाळी अंकात सातत्याने प्रकाशित होत आहेत. इ.स. १९९४पासून मोनिका मौज प्रकाशन गृहात साहाय्यक-संपादक आहेत. मौज प्रकाशनाने इ.स. २००४मध्ये प्रकाशित केलेला 'भूप' आणि इ.स. २००८मध्ये प्रकाशित केलेला 'आर्त' हे त्यांचे दोन गाजलेले कथासंग्रह. 'आर्त' कथासंग्रहातून त्यांनी वेगवेगळ्या स्तरातील माणसांच्या जगण्यातील विकलता समोर आणली आहे. सूचक, संयत आणि अकृत्रिम शैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. व्याकुळता हीच त्यांच्या कथांचा गाभा आणि सौंदर्य ठरले आहे तर 'भूप' या पहिल्याच वेचक दीर्घकथांच्या संग्रहात लेखिकेने नातेसंबंधांचा विविध अंगांनी वेध घेतला आहे.

मोनिका गजेंद्रगडकर हे आजच्या लिहित्या कथाकारांपैकी एक आश्वासक नाव आहे. अनेक सभा-संमेलनांत आणि दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. ’कालनिर्णय’ या दिनदर्शिकेच्या मराठी आवृत्तीच्या त्या संपादक आहेत. मोनिका गजेंद्रगडकर कथालेखनाव्यतिरिक्त नाट्यविषयक आणि समीक्षणात्मक लिखाण करतात.

'बापलेकी' या विद्या विद्वांस, दीपा गोवारीकर आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकातल्या लेखात, मोनिकाबाईंनी आपल्या अश्विन नावाच्या भावाचा अपघाती मृत्यू ज्या दिवशी झाला, त्या दिवसाबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.

मोनिका गजेंद्रगडकर यांच्या भूप या कथेवर आधारलेले एक नाटक मंदार जोशी यांनी लिहिले आहे. नाट्यसंपदा ते नाटक रंगभूमीवर आणीत आहे.त्या नाटकासाठी सुधीर मोघे यांनी ११ गाणी लिहिली होती. त्यांतली १० गाणी त्या नाटकात असतील. नाटकाचे संगीत दिग्दर्शन रघुनंदन पणशीकर यांचे आहे. ही गाणी म्हणजे कै. सुधीर मोघे यांची अखेरची काव्यरचना असावी.

साहित्य - कथासंग्रह[संपादन]

 • आर्त (२००८)
 • उगम (कादंबरी, २०१५)
 • भूप (२००४)
 • शिल्प (२०११)

मोनिका गजेंद्रगडकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

 • अण्णाभाऊ साठे साहित्य रत्‍न पुरस्कार
 • कथाकार अ.वा. वर्टी पुरस्कार
 • गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार (२०११)
 • दैनिक सकाळची कथा पारितोषिके (१९९५-१९९७)
 • नागपूरच्या विदर्भ साहित्त्य संघाचा शांताराम कथा पुरस्कार
 • मराठी कथा साहित्यातील योगदानाबद्दल २५ हजार रुपयांचा प्रियदर्शनी साहित्य पुरस्कार (२५ जून २०१०)
 • मराठी साहित्य संघाचा आश्वासक कथाकार पुरस्कार
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २००० सालचा उत्कृष्ट कथेसाठीचे दि.य. सोनटक्के पारितोषिक
 • 'शिल्प' या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य सरकारचा दिवाकर कृष्ण पुरस्कार (२०१३)
 • स.गं. मालशे संशोधनवृत्तीच्या मानकरी
 • सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कार मोनिका गजेंद्रगडकर यांच्या शिल्प या कथासंग्रहास जाहीर झाला आहे.

संदर्भ[संपादन]