मॉसिनराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मॉसिनराम हे मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्हात असलेले खेडेगाव आहे. शिलाँगपासून ६५ किलोमीटरवर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल ११८७२ मिलिमीटर ( ४६७.४ इंच) पाऊस होतो.[१]

मॉसिनरामच्या पावसाच्या नोंदी विचारात घेतल्यानंतर मेघालयामधीलच चेरापुंजी गावाचा जगातील सर्वाधिक पावसाचा दावा संपुष्टात आला आहे.

भारतातील जास्तीत जास्त पाऊस पडणारी ठिकाणे[संपादन]

१. मॉसिनराम (वार्षिक पाऊस ११,८७२ मिलिमीटर)
२. चेरापुंजी (वार्षिक पाऊस ९,३०० मिलिमीटर)
३. अगुंबे-कर्नाटक (वार्षिक पाऊस ७,७२४ मिलिमीटर)
४. आंबोली-महाराष्ट्र (वार्षिक पाऊस ७,५०० मिलिमीटर)

संदर्भ[संपादन]